Homeताज्या बातम्यापुणे सोलापूर महामार्गासह परीसरात जीवावर बेतणारे बेकायदेशीर होल्डिंग व बॅनरबाजी; नियम धाब्यावर,...

पुणे सोलापूर महामार्गासह परीसरात जीवावर बेतणारे बेकायदेशीर होल्डिंग व बॅनरबाजी; नियम धाब्यावर, जबाबदार कोण? 

पुणे सोलापूर महामार्गासह परीसरात जीवावर बेतणारे बेकायदेशीर होल्डिंग व बॅनरबाजी; नियम धाब्यावर, जबाबदार कोण? 
✍️ नितीन करडे |

उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गा सहित परिसरातील गावामधे अनधिकृत बॅनर व होल्डिंगचा अक्षरशः ‘मृत्यू सापळा’ उभा राहिला आहे. राजरोसपणे लावलेले प्रचंड बॅनर, होल्डिंग आता थेट नागरिकांच्या जीवावर उठले असून प्रशासन मात्र अद्याप गाढ झोपेत असल्याचा संतापजनक आरोप नागरिकांकडून होत आहे. सध्या अवकाळी पाऊस, सुसाट वारा येत आहे. या सुसाट वाऱ्यामुळे बॅनर व होल्डिंग नागरिकांच्या जीवावर उठले आहेत.

गुरुवार (ता. २) रोजी पुणे–सोलापूर महामार्गावरील तळवाडी चौकात भीषण प्रकार घडला. तब्बल ४० ते ४५ फूट उंचीवरून सुटलेले ४×४ साईजचा बॅनर थेट एका महिलेच्या व मुलाच्या डोक्यावर आदळला. या घटनेत महिला जखमी झाली; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

शुक्रवार (ता. ३) रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसात उरुळी कांचन येथील जगदंबा फर्निचरच्या गोदामावर तब्बल ५० ते ६० फूट उंचीचे लोखंडी होल्डिंग कोसळले. या दुर्घटनेत दुकानदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती मालक म्हस्के यांनी दिली.

या वादळी वाऱ्यात परिसरातील अनेक ठिकाणी लाकडी बॅनर व लोखंडी फ्रेम असलेले होल्डिंग कोसळले आहेत. त्यामुळे परिसरात अक्षरशः भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महामार्गाच्या डीव्हायडरवर, वीज खांबांवर, रस्त्याच्या बाजूला, चौकाचौकांत आणि अगदी ओढ्याच्या पुलावरील सुरक्षाजाळीवरही बेकायदेशीर आपल्या जाहिरातीचे बॅनर लावले आहेत. अनेक ठिकाणी व महामार्गाच्या सेवा रस्त्यावर जाळीसकट बॅनर कोसळून रस्त्यावर धोकादायक पडले आहेत.

 “पुणे सोलापूर महामार्गावर लटकलेले अवस्थेत धोकादायक फ्लेक्स” 

सार्वजनिक ठिकाणी जीव धोक्यात घालणारे हे होल्डिंग तात्काळ हटवून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा एखादी भीषण दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावरच येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

“पुणे सोलापूर महामार्गा सह परिसरात होल्डिंग, बॅनरचा महापूर, पण कारवाई शून्य! संपूर्ण परिसरात होल्डिंगचा सुळसुळाट झाला असून प्रशासनाची भूमिका मात्र ‘निष्क्रिय’च दिसत आहे. कारवाई कधी?”

[आपल्याकडून कोणालाही फ्लेक्स (बॅनर) होल्डिंग लावण्यास परवानगी नाही, उरुळी कांचन परीसरातील लावण्यात आलेले फ्लेक्स (बॅनर ) काढण्यात येईतील, होल्डिंग बाबत पोलीस स्टेनला पञव्याहार केला जाईल.]

 – श्रीकांत वाव्हळ – उरुळी कांचन, ग्रामविकास अधिकारी 

[होल्डिंग कोसळल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. पडलेल्या होल्डिंगची शहानिशा करून योग्य ती कारवाई केली जाईल, आमची टीम रवाना झाली आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील पीएम आरडी हद्दीत येणाऱ्या होल्डिंगची पाहणी करून अनाधिकृत होल्डिंग वर लवकरच कारवाई केली जाईल,]

– हिम्मत खराडे, अधिकारी पीएमआरडी पुणे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

error: Content is protected !!