Homeताज्या बातम्याउरुळी कांचन येथे पुन्हा नवीन चौकात दोन अपघात; दोन जण जखमी

उरुळी कांचन येथे पुन्हा नवीन चौकात दोन अपघात; दोन जण जखमी

उरुळी कांचन येथे पुन्हा नवीन चौकात दोन अपघात ; दोन जण जखमी

✍️ नितीन करडे 
उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) येथे वाहनांना नवीन चौकाचा अंदाज येत नसल्याने आज पहाटे पुन्हा दोन तासात दोन अपघात झाले असुन यात दोन जण जखमी झाले आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नवीन चौक करण्यात आले यात होणाऱ्या ‘ वाहतुक कोंडीतुन नागरिक सुटले, पण अपघातात सापडले ‘ नवीन चौकात सतत अपघात पाहायला मिळत असल्याने नागरिक बोलत आहेत.

” उरुळी कांचन येथील नवीन चौकात उपाययोजना अभावी अनेक अपघात, उपाय योजनेसाठी संबंधित प्रशासन नागरिकांचा बळी जाण्याची वाट पाहतय का ? वाहन चालकांसह नागरिकांचा सवाल”

मिळालेल्या माहितीनुसार (ता. 26) मंगळवार रोजी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथील कस्तुरी मंगल कार्यालयाच्या समोरील नवीन चौकात एक वळण घेत असलेल्या आयशर टेम्पो ला पाठीमागून हायवा ट्रकने जोरदार धडक दिली यात दहा टायर डंपर हायवा ट्रक मधील पवन सिंग वय 32 रा. उत्तर प्रदेश व अन्वर शहा उत्तर प्रदेश हे दोघे जखमी झाले आहेत. त्याच चौकात सात वाजण्याच्या दरम्यान टाटा कंपनीचा 407 टेम्पो पुण्याच्या दिशेने वळण घेत असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात टेम्पो रस्त्यावरून कस्तुरी कार्यालयाच्या आवारात घुसला, त्यावेळी सुदैवाने महामार्गवरुन कुठलेही वाहन येत नसल्याने मोठा अपघात टळला.

{अपघात ग्रस्त वाहन भर रस्त्यात उभे असल्याने पुन्हा अपघातास निमंत्रण- 

गाव असुन दिशा फलक आणि वाहनांची गती कमी करणाऱ्या उपाययोजना अध्याप नाही. नवीन चौकातुन वाहनांना वळण घेताना व जाताना अंदाज येत नसल्याने सतत अपघाताची मालिका सुरुच आहे. महामार्गावरून वाहने बेभान चालतात, या चौकात रंम्बलर, हायमास दिवे, दिशादर्शक फलक, फ्लेशर ( लुक लुक दिवे) चौकात पोलीस कर्मचारी नसल्याने नवीन चौकात सतत अपघात होत आहेत, उपाय योजनेसाठी संबंधित प्रशासन याठिकाणी नागरिकांचे बळी जाण्याची प्रतीक्षा करतय का ?
अलंकार कांचन, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य.
सकाळी साडे सहाच्या दरम्यान ट्रक पास करुन समोरून टेम्पोने अचानक वळण घेतले , टेम्पोने इंडिकेटर (फ्लेशर) लावला नव्हता , वळण्यासाठी टेम्पो अचानक आडवा येऊन थांबल्याने अपघात झाला
– इनुस अन्सारी , ट्रक चालक.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास! पांगारे वस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार कोयता घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी...

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल!

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर 'मोक्का' अंतर्गत गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे पुणे : कोंढवा परिसरात अवैध गांजा विक्री करून दहशत निर्माण करणाऱ्या...

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हिंजवडी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत घडलेल्या खूनप्रकरणातील आरोपीला...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन घरमालकांवर गुन्हे ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे ग्रामीण दहशतवाद...

मिरवडी ग्रामपंचायतीत सायबर जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद!

मिरवडी ग्रामपंचायतीत सायबर जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद क्विक हील फाउंडेशनच्या 'सायबर शिक्षणातून सायबर सुरक्षा' उपक्रमांतर्गत नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : वाढत्या...

error: Content is protected !!