Homeताज्या बातम्यावरवंड येथील खुनातील आरोपींना पोलीसांनी दोन दिवसात केले जेरबंद

वरवंड येथील खुनातील आरोपींना पोलीसांनी दोन दिवसात केले जेरबंद

✍️ नितीन करडे 

पुणे : वरखंड (ता. दौंड) गावचे हद्दीत एका युवकाचा विटा व सिमेंटचे ठोकळे डोक्यात घालुन खुन केल्याची घटना ता. ०६ रोजी उघडकीस आली होती. यात आरोपी ने कुठल्याप्रकारचा पुरावा मागे सोडला नव्हता. तरी ही पोलीसांनी दोन दिवसात खून करणाऱ्या दोन आरोपींचा छडा लावून आरोपींना जेरबंद केले. वरखंड (ता. दौंड) जि. पुणे, गावाच्या हद्दीत पुणे-सोलापुर महामार्गाच्या कडेला मयत इसम शैलेंद्रकुमार सुशिलकुमार विमल वय ३३ वर्षे, मुळ रा. जमोहना पोस्ट सोनहा ता. भानपुर बाबु, जि. बस्ती, रा. उत्तरप्रदेश, सध्या राहणार वरखंड वरसगाव, यांचा अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात सिमेंट व विटाचा ठोकळा मारून खुन झाला असल्याचा गुन्हा यवत पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास चालू असताना तात्रिंक विश्लेषण, सी. सी. टी. व्ही. तपासणी करून गोपनीय बातमीदार मार्फत माहीती घेवुन खुन झालेला शैलेंद्रकुमार सुशिलकुमार विमल यास विनोद उर्फ नंदु दत्तात्रय रणधीर रा. वरखंड ता. दौंड जि. पुणे व गणेश उर्फ अक्षय तानाजी उमाटे वय २८ वर्षे मुळ रा. तेरढोकी ता. जि. धाराशिव, सध्या रा. कानिफनाथ नगर वरखंड ता. दौंड यांनी संगनमताने मयताच्या डोक्यात विटा व सिमेंटचे ठोकळे घालुन खुन केला असल्याची माहीती मिळाल्याने आरोपी यांना अटक करुन ताब्यात घेवुन गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सदरचा खुन केल्याची कबुली दिली असल्याचे पोलीसांनी सांगितले.

वरवंड येथील खुनातील आरोपींना पोलीसांनी दोन दिवसात केले जेरबंद ; परिसरात पोलिसांचे कौतुक.

ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, पुणे ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस दौंड विभाग, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, यांचे मार्गदर्शनाखाली सहा पो निरीक्षक प्रविण संपांगे, सहा पो निरीक्षक महेश माने, पोलीस उप-निरीक्षक सलीम शेख, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक भोसले, सहा. फौज महेंद्र फणसे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो हवा अजित भुजबळ, योगेश नागरगोजे राजु मोमीन, गुरुनाथ गायकवाड,संदीप देवकर, अक्षय यादव, विकास कापरे, महेंद्र चांदणे, राम जगताप, दत्तात्रय काळे, प्रमोद गायकवाड, हिरालाल खोमणे, मुटेकर, पानसरे, विनायक हाके, पो कॉ भारत भोसले, मारुती बाराते, प्रतिक गरूड, मोहन भानवसे, प्रणव ननवरे यांनी केली. तसेच गुन्हयाचा पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एस. जी. शेख हे करीत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढव्यात १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा बनावट मावा जप्त ; अंमली पदार्थ विरोधी...

कोंढव्यात १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा बनावट मावा जप्त अंमली पदार्थ विरोधी पथक-२ व अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई; दोघांकडून बनावट मावा ताब्यात ✍️...

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा...

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा ६७ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकावर गुन्हा दाखल ✍️ नितीन...

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले..”आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन”

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले.."आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन" वाडेबोल्हाई/पुणे:विजय लोखंडे कोपर्डी(ता.कर्जत) येथे आदर्श शिक्षक किसन काळूराम चव्हाण (वय ५६) यांचे गुरुवार,दि.६...

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास! पांगारे वस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार कोयता घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी...

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल!

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर 'मोक्का' अंतर्गत गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे पुणे : कोंढवा परिसरात अवैध गांजा विक्री करून दहशत निर्माण करणाऱ्या...

error: Content is protected !!