Homeक्राईमयुवतीच्या खुनाचा उलगडा; आरोपी जेरबंद — स्थानिक गुन्हे शाखा व उरुळी कांचन...

युवतीच्या खुनाचा उलगडा; आरोपी जेरबंद — स्थानिक गुन्हे शाखा व उरुळी कांचन पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

युवतीच्या खुनाचा उलगडा; आरोपी जेरबंद — स्थानिक गुन्हे शाखा व उरुळी कांचन पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

✍️ प्रतिनिधी — नितीन करडे

उरुळी कांचन (ता. हवेली) : उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत सापडलेल्या २० वर्षीय युवतीच्या खुनाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व उरुळी कांचन पोलिसांनी केवळ काही दिवसांत उघडकीस आणत आरोपीस जेरबंद केले आहे. या गुन्ह्याचा तपास उच्च पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कसोशीने करण्यात आला.

दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ७.३० वाजता, उरुळी कांचन ते नायगाव रस्त्यावरील प्रयागधाम हॉस्पिटलजवळ गगन आकांक्षा सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका युवतीचा मृतदेह आढळून आला. मृत युवतीचे नाव पुनम विनोद ठाकूर (वय २० वर्षे, रा. गगन आकांक्षा सोसायटी, कोरेगाव मुळ, ता. हवेली, जि. पुणे) असे असून ती नोकरी करणारी होती. घटनास्थळी तिचा मोबाईल फोन, सॅक, चप्पल पडलेली होती. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झालेला होता. मयत युवतीचा भाऊ मनिष विनोद ठाकूर (वय २३ वर्षे) यांनी उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला.

🔹 तपासाची दिशा आणि पोलिसांची मेहनत

लोकवस्तीच्या अगदी जवळ झालेल्या या खुनामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, पुणे ग्रामीण यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली. तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी (कोल्हापूर परिक्षेत्र) यांना घटनेची माहिती देण्यात आली.

त्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा व उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे चार स्वतंत्र तपास पथक तयार करण्यात आले.या पथकांनी घटनास्थळापासून जाणाऱ्या रस्त्यांवरील सुमारे ६०-७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. तसेच मृत युवतीच्या संपर्कातील व परिसरातील २०० ते २५० व्यक्तींची चौकशी करण्यात आली.

उरुळी कांचन पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त तपासातून खून प्रकरणाचा उलगडा; आरोपी दिनेश पाटोळे पोलीस कोठडीत

सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती मोटारसायकलवरून घटनास्थळाच्या दिशेने जाताना दिसला. फुटेज नागरिक आणि गुप्त बातमीदारांना दाखविल्यानंतर त्याची ओळख दिनेश संजय पाटोळे (वय २६, रा. गोळेवस्ती, उरुळी कांचन) अशी पटली. तपास पथकाने त्याच्यावर लक्ष ठेवून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने युवतीचा पाठलाग करून तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. युवतीने नकार देऊन विरोध केला असता आरोपीने तिचे तोंड दाबून झुडपात ओढले. तीने आरडाओरडा केल्याने संतापलेल्या आरोपीने दगडाने तिच्या डोक्यात मारून तिचा खून केला, असे तपासात उघड झाले आहे. तसेच तपासात आरोपीने गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच-१२ एस झेड ६९६५) जप्त करण्यात आली आहे. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता, दि. २७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.

🔹 पोलिसांचे मार्गदर्शन व पथकाची कामगिरी

ही उत्कृष्ट कामगिरी खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली : विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी (कोल्हापूर परिक्षेत्र) पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल (पुणे ग्रामीण), अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार (बारामती विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस (दौंड विभाग), तसेच प्रत्यक्ष कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार : पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर (स्थानीक गुन्हे शाखा), पो.नि. सचिन वांगडे (उरुळी कांचन पो.स्टे), स.पो.नि. ज्ञानेश्वर बाजीगरे, सपोनि दत्ताजीराव मोहिते, पोसई अमित सिदपाटील, पोसई ईश्वर जाधव आणि स्था. गु.शा. व उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे सर्व अंमलदार. या सर्व अधिकाऱ्यांनी अत्यंत व्यावसायिक पद्धतीने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही विश्लेषण, गुप्त माहिती संकलन आणि आरोपीचा शोध घेऊन गुन्ह्याचा उलगडा केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत. गुन्ह्याचा उलगडा झाल्याने पुणे ग्रामीण पोलीस दलाने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता आणि तपास कौशल्य सिद्ध केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे–सोलापूर महामार्गावर ‘राँग साईड’चा कहर; रॉंग साईडने येणाऱ्या वाहनांमुळे उरुळी कांचन येथील चौक बनत...

पुणे–सोलापूर महामार्गावर ‘राँग साईड’चा कहर; रॉंग साईडने येणाऱ्या वाहनांमुळे उरुळी कांचन येथील चौक बनत आहेत मृत्यूचा सापळा ✍️नितीन करडे उरुळी कांचन : पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन...

ओतूर पोलीस स्टेशनकडून रोड सेफ्टी जनजागृती अभियान!

ओतूर पोलीस स्टेशनकडून रोड सेफ्टी जनजागृती अभियान ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांच्या सूचनेनुसार पुणे ग्रामीण हद्दीतील अपघातांचे प्रमाण...

उरुळी कांचन वाहतूक पोलिसांच्या कारभारावर नागरिकांचा सवाल; चुकीच्या पावत्या, वाहतूक कोंडी व ध्वनीप्रदूषणाकडे दुर्लक्ष...

उरुळी कांचन वाहतूक पोलिसांच्या कारभारावर नागरिकांचा सवाल; चुकीच्या पावत्या, वाहतूक कोंडी व ध्वनीप्रदूषणाकडे दुर्लक्ष ? ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील...

आळंदी PMPML बस स्थानकात भीषण अपघात

बसच्या मागील चाकाखाली आल्याने अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू; परिसरात हळहळ (✍️अर्जुन मेदनकर)  आळंदी प्रतिनिधी :आळंदी येथील गजबजलेल्या PMPML बस स्थानकात सोमवार (दि. ११ मे) दुपारी अडीच...

उरुळी कांचनमध्ये पुन्हा वाहतूक कोंडीचा विस्फोट; नागरिक, व्यापारी, संतप्त

उरुळी कांचनमध्ये पुन्हा वाहतूक कोंडीचा विस्फोट; नागरिक, व्यापारी, संतप्त ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी: पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन Uruli Kanchan परिसरात वाहतूक कोंडीने पुन्हा डोके...

error: Content is protected !!