Homeक्राईममोबाईल चोराला लोणी काळभोर पोलीसांनी ठोकल्या बेड्या; चोराकडून ४ लाख ६९ हजाराचा...

मोबाईल चोराला लोणी काळभोर पोलीसांनी ठोकल्या बेड्या; चोराकडून ४ लाख ६९ हजाराचा मुद्देमाल जप्त

✍️नितीन करडे

उरुळी कांचन : – लोणी काळभोर पोलिसांनी अटक आरोपीकडून एकुण ४,६९,०००/– रुपयांचे मोबाईल व दुचाकी जप्त केली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत (ता. १७ मे) रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास श अनिरुध्द संतोष खताळ रा. कदमवाकवस्ती पुणे हा त्यांचा मित्र राजिव शहा याच्या बरोबर कदमवाकवस्ती येथील जिल्हा कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या समोर रोडने चालत जात असताना, दोन अनोळखी व्यक्ती दुचाकी गाडीवरुन पाठीमागुन आले. व त्यांनी अनिरुध्द खताळ यांच्या हातातील विवो कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट हिसकावुन पसार झाले. असल्याची लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव व त्यांचे पथकास खबरी मार्फत माहिती मिळाली कि (ता. ०७ जुलै) रोजी दाखल गुन्हयातील आरोपी हे गुन्हयात चोरुन नेलेला मोबाईल विकण्यासाठी कवडीपाट टोल नाका येथे येणार आहेत. हि माहिती मिळताच पोलीस उप निरीक्षक अनिल जाधव व त्यांच्या पथकाने कवडीपाट टोलनाका येथे सापळा रचुन दुचाकी गाडीवरुन आलेल्या दोन संशयीतांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे त्यांचे नाव विचारले त्यांचे नाव १) विशाल विलास काळे (वय २३ वर्षे) रा. ढेरे बंगल्याजवळ, गोपाळपट्टी, मांजरी २) रितेश भिमराव चव्हाण वय १८ वर्षे रा. गोपाळपट्टी मांजरी रोड पुणे, असे असल्याचे सांगितले. त्यांना लोणी काळभोर पोलीसांनी ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचाकडे हिसकावुन नेलेला विवो कंपनीचा मोबाईल मिळुन आला. तो मोबाईल दाखल गुन्हयातील असल्याची खात्री झाल्यावर त्याला व त्यांचे ताब्यातील दुचाकी गाडी ही त्यांनी गुन्हयात वापरलेली असल्याचे आरोपींनी कबुल केल्याने तो मोबाईल व दुचाकी गाडी त्यांचेकडुन पोलीसांनी जप्त केली. अटक आरोपीकडे सखोल तपास केला. त्यात आरोपीकडुन अनेक कंपनीचे १८ मोबाईल हॅन्डसेट जप्त करण्यात आले. ते १८ मोबाईल विवीध ठिकाणीवरून चोरी केले असल्याचे आरोपीने सांगितले. याबाबत लोणी काळभोर पोलीस अधिक तपास करीत आहेत. अटक आरोपीकडुन एकुण ४,१९,०००/- रुपयांचे एकुण १९ मोबाईल व ५०,०००/- रुपये किंमतीची ॲक्टीव्हा मोपेड गाडी असा एकुण ४,६९,०००/- रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.

ही कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, पोलीस उप निरीक्षक अनिल जाधव, पो हवा संभाजी देवीकर, गणेश सातपुते, रामहरी वणवे, सागर जगदाळे, तेज भोसले, आण्णा माने, पो.शि. बाजीराव विर, शैलेश कुदळे, योगेश पाटील, चक्रधर शिरगिरे, राहुल कर्डीले, प्रविण दडस, प्रदिप गाडे, सचिन सोनवणे, सुरज कुंभार, मपोशि उषा थोरात यांनी केली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी! ✍️ नितीन करडे पुणे : गणेशोत्सवाच्या काळात तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतील...

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

error: Content is protected !!