Homeसामाजिकपुणे-सोलापूर महामार्गावर जीवघेणा स्टंट! २० फूट उंच डीजे गाडीवर तरुणांचा धिंगाणा; व्हिडीओ...

पुणे-सोलापूर महामार्गावर जीवघेणा स्टंट! २० फूट उंच डीजे गाडीवर तरुणांचा धिंगाणा; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

उरुळी कांचन : पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी येथे एका डीजे वाहनावर अंदाजे २० फूट उंचीवर ८ ते १० जण धोकादायकरित्या नाचत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. भररस्त्यावर सुरू असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, संबंधितांवर कठोर कारवाई होणार का, याबाबत चर्चा रंगली आहे.

व्हिडीओमध्ये डीजे वाहनाच्या वरच्या भागावर कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नसताना अनेक युवक बेधडकपणे नाचत असल्याचे दिसत आहे. अशा प्रकारामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, महामार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाला होता.

स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, “अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा सवाल उपस्थित केला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन, जीवितास धोका आणि सार्वजनिक सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल घेऊन संबंधित वाहन व त्यावरील युवकांची ओळख पटवून कायदेशीर कारवाई केली जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. महामार्गावर अशा प्रकारच्या जीवघेण्या कृत्यांना वेळीच आळा घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई!

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई ✍️ नितीन करडे दौंड : यवत (ता. दौंड) पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाईची...

सासवड पोलिसांची दमदार कारवाई; गावठी पिस्टलसह तरुणाला अटक!

सासवड पोलिसांची दमदार कारवाई; गावठी पिस्टलसह तरुणाला अटक ✍️ नितीन करडे सासवड : सासवड पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दमदार कारवाई करत अवैध गावठी पिस्टल बाळगणाऱ्या...

सुपे घाटात शाळकरी मुलांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सुपे घाटात शाळकरी मुलांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण ✍️ नितीन करडे सुपे : सुपे घाटातील चढावर शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस...

उरुळी कांचनमध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन; केरळचे पारंपरिक चेंडा वाद्य, ढोल-ताशांचा गजर अन् २५ डीजेंच्या...

उरुळी कांचनमध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन; केरळचे पारंपरिक चेंडा वाद्य, ढोल-ताशांचा गजर अन् २५ डीजेंच्या दणदणाटात आश्रम रोडवर हजारो भक्तांची गर्दी ✍️ नितीन करडे उरुळी कांचन :...

दहिहंडी उत्सवादरम्यान ‘किंग ऑफ दौंड’ रील; आयोजकांसह रेकॉर्डवरील आरोपींवर यवत पोलिसांचा कायदेशीर चाप!

दहिहंडी उत्सवादरम्यान ‘किंग ऑफ दौंड’ रील; आयोजकांसह रेकॉर्डवरील आरोपींवर यवत पोलिसांचा कायदेशीर चाप.. केडगाव येथे सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा आरोप; इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह रीलप्रकरणी...

error: Content is protected !!