Homeक्राईमदहिहंडी उत्सवादरम्यान ‘किंग ऑफ दौंड’ रील; आयोजकांसह रेकॉर्डवरील आरोपींवर यवत पोलिसांचा कायदेशीर...

दहिहंडी उत्सवादरम्यान ‘किंग ऑफ दौंड’ रील; आयोजकांसह रेकॉर्डवरील आरोपींवर यवत पोलिसांचा कायदेशीर चाप!

दहिहंडी उत्सवादरम्यान ‘किंग ऑफ दौंड’ रील; आयोजकांसह रेकॉर्डवरील आरोपींवर यवत पोलिसांचा कायदेशीर चाप..
केडगाव येथे सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा आरोप; इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह रीलप्रकरणी गुन्हा दाखल..

✍️ नितीन करडे

दौंड : दहिहंडी उत्सवादरम्यान सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करून सोशल मीडियावर दहशत निर्माण करणाऱ्या आशयाची रील प्रसारित केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी दहिहंडी आयोजकांसह रेकॉर्डवरील आरोपी व त्यांच्या साथीदारांवर कायदेशीर कारवाई केली आहे. केडगाव (ता. दौंड) येथे श्रीकृष्ण दहिहंडी कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

ता. ९ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे केडगाव गावच्या हद्दीत श्रीकृष्ण दहिहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आयोजक शुभम प्रकाश टेळे (रा. टेळेवाडी, ता. दौंड) आणि रामकृष्ण आनंदा काळे (रा. बोरीपारधी, ता. दौंड) यांनी काही रेकॉर्डवरील आरोपी व त्यांच्या साथीदारांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याचे पोलिसांच्या कारवाईत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकारानंतर सोशल मीडियावरही संबंधितांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. रेकॉर्डवरील आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी केलेल्या रीलमध्ये ‘किंग ऑफ दौंड’ अशा आशयाचे कॅप्शन वापरले. तसेच दहशत निर्माण होईल, अशा आशयाचे गाणे रीलमध्ये वापरून ती इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात पोलिसांनी परशुराम उर्फ आबा केरू गडदे, नवनाथ पंढरीनाथ गायकवाड, गौरव उर्फ बंटी दिनेश पांढरे, युवराज राजाराम शिंदे, महेश मारुती टुले, विशाल दादासो गडदे आणि विशाल उर्फ अण्णा माकर या रेकॉर्डवरील आरोपींसह सौरभ कोळपे, अनिल शेंडगे व इतर १५ साथीदारांवर कारवाई केली आहे.

दहिहंडी कार्यक्रमाच्या नावाखाली सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीने वर्तन करणे आणि सोशल मीडियावर दहशत निर्माण करणारा आशय प्रसारित करणे, या बाबी पोलिसांनी गांभीर्याने घेतल्या आहेत. या प्रकरणी संबंधित आयोजक, आरोपी व त्यांच्या साथीदारांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावरील दहशत निर्माण करणाऱ्या पोस्टवर पोलिसांची नजर

दहिहंडी, गणेशोत्सव किंवा अन्य सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह, चिथावणीखोर अथवा दहशत निर्माण करणाऱ्या स्वरूपाचा मजकूर, व्हिडिओ किंवा रील प्रसारित करणाऱ्यांवर यापुढेही कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. सार्वजनिक कार्यक्रमांच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर कदम, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड यांच्यासह पोलीस हवालदार संदिप देवकर, रॉकी देवकाते, महेंद्र चांदणे, पोलीस कॉन्स्टेबल धिरज जाधव, प्रतिक जगताप, अमोल भुजबळ, मारुती बाराते, विनोद काळे, सचिन गुंड, दिनेश लोणकर आणि विनित कुऱ्हाडे यांनी ही कारवाई केली.

दहिहंडी उत्सवाच्या माध्यमातून कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणे किंवा सोशल मीडियावर दहशत निर्माण करणारा आशय प्रसारित करणे महागात पडू शकते, असा इशारा यवत पोलिसांच्या या कारवाईतून देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा रूट मार्च!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा रूट मार्च प्रमुख चौक व मार्गांवर पोलिसांची प्रभावी उपस्थिती; नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : आगामी...

यवत पोलिसांकडून गिट्स कंपनीतील तांब्याची केबल चोरी करणारा आरोपी जेरबंद!

यवत पोलिसांकडून गिट्स कंपनीतील तांब्याची केबल चोरी करणारा आरोपी जेरबंद एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध |✍️ नितीन करडे | यवत पोलीस स्टेशन...

उरुळी कांचनच्या हेमलता बडेकर यांची राज्यस्तरीय महिला आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती!

उरुळी कांचनच्या हेमलता बडेकर यांची राज्यस्तरीय महिला आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती उरुळी कांचन : अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक महासंघाच्या राज्यस्तरीय महिला आघाडीच्या...

सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उरुळी कांचन : (८ सप्टेंबर) उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य...

उरुळी कांचन येथे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी!

उरुळी कांचन येथे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी: उरुळी कांचन (ता. हवेली) येथे स्वातंत्र्यसंग्रामातील धाडसी क्रांतिकारक आणि आद्य स्वातंत्र्यवीर...

error: Content is protected !!