Homeमहत्त्वाचेओतूर पोलीस स्टेशनकडून रोड सेफ्टी जनजागृती अभियान!

ओतूर पोलीस स्टेशनकडून रोड सेफ्टी जनजागृती अभियान!

ओतूर पोलीस स्टेशनकडून रोड सेफ्टी जनजागृती अभियान
✍️ नितीन करडे

पुणे प्रतिनिधी : पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांच्या सूचनेनुसार पुणे ग्रामीण हद्दीतील अपघातांचे प्रमाण १५ ते २० टक्क्यांनी कमी करण्याच्या उद्देशाने रोड सेफ्टी व वाहन चालकांमध्ये जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत विविध ठिकाणी जनजागृतीपर सूचना फलक लावण्यात येत असून वाहन चालकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण केली जात आहे.

या मोहिमेदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी स्पष्ट केले आहे. विशेषतः दारू पिऊन वाहन चालवणे, अतिवेगाने वाहन चालवणे, तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सदर अभियान हे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

वाहतूक जनजागृती अभियानामध्ये नागरिकांना मोबाईलचा घातक वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे किंवा चॅटिंग करणे जीवघेणे ठरू शकते, असे पोलिसांनी सांगितले. तसेच अपघाताच्या वेळी डोक्याचे गंभीर दुखापतीपासून संरक्षण होण्यासाठी हेल्मेट वापरण्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.

दारू पिऊन वाहन चालवणे म्हणजे स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या आयुष्याशी खेळण्यासारखे असल्याचा इशारा देण्यात आला आहे. सीट बेल्टचा वापर केल्यास प्रवाशांचा जीव वाचू शकतो, त्यामुळे प्रत्येकाने सीट बेल्ट लावणे आवश्यक असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले. अतिवेगामुळे अपघात होण्याची शक्यता वाढत असल्याने वाहनाचा वेग नियंत्रित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच विना परवाना वाहन चालवणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे नागरिकांना समजावून सांगण्यात आले.

अपघात झाल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक ११२ वर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. “वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा” हा संदेश देत ओतूर पोलीस स्टेशन यांच्या वतीने रस्त्यांवर जागोजागी जनजागृती फलक लावण्यात आले आहेत.

यावेळी ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

error: Content is protected !!