Homeआरोग्यउरुळी कांचन PHC चा कायापालट; नूतनीकरणाची तपासणी करत C.E.O. पाटील यांचा ठेकेदाराला...

उरुळी कांचन PHC चा कायापालट; नूतनीकरणाची तपासणी करत C.E.O. पाटील यांचा ठेकेदाराला कडक इशारा

उरुळी कांचन PHC चा कायापालट; नूतनीकरणाची तपासणी करत C.E.O. पाटील यांचा ठेकेदाराला कडक इशारा

✍️नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) शहरालगत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुतनीकरणाच्या कामाचा दर्जा उच्च प्रतीचा असावा, असा स्पष्ट इशारा जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ठेकेदाराला दिला आहे. बुधवारी रात्री तब्बल 9.30 वाजता त्यांनी अचानक भेट देत संपूर्ण कामकाजाची पाहणी केली.

या तपासणीदरम्यान C.E.O. पाटील म्हणाले, “कामात कुठेही हलगर्जी किंवा दर्जाहीन साहित्य चालणार नाही. हे केंद्र नागरिकांच्या आरोग्याशी आणि जीवाशी संबंधित आहे, त्यामुळे कामाचा दर्जा सर्वोत्तमच हवा.” यावेळी त्यांनी ठेकेदारास कामाच्या गती आणि गुणवत्तेबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या.

उरुळी कांचन PHC चे नूतनीकरण दर्जेदारच असावे C.E.O. पाटील

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नुतनीकरणाचे काम सुरू असून नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा व सुविधा उपलब्ध करून देणे हा जिल्हा परिषदेचा मुख्य उद्देश आहे. तसेच उरुळी कांचन PHC मधे नवीन सुसज्ज कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ग्रह (ऑपरेशन थिएटर ) बांधण्यात येणार आहे. उरुळी कांचन PHCचे नुतनीकरण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांसह कामगार वर्गाला मोठा लाभ होणार आहे.

    : गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी,

उरुळी कांचन PHCमध्ये गेल्या काही वर्षांत नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता प्रसूती सेवा, आपत्कालीन उपचार, सरकारी आरोग्य योजना, लसीकरण व नियमित तपासण्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. वाढती लोकसंख्या आणि वाढत्या सेवांच्या मागणीमुळे नुतनीकरण अत्यावश्यक झाले होते.

उरुळी कांचन येथे पोस्टमॉर्टम सुविधा उपलब्ध असल्याने परिसरातील नागरिक समाधानी- वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत हनुमंते. 

या पाहणीवेळी भूषण जोशी (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे), शेखर शेलार (गटविकास अधिकारी, पंचायत समिती हवेली), डॉ. सुरेश गोरे (आरोग्य अधिकारी, हवेली), संजय गीते (उपअभियंता, बांधकाम विभाग), महेश वाघमारे (विस्तार अधिकारी) आणि शिरीष मोरे आदी अधिकारी उपस्थित होते. तर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत हनुमंते व संपूर्ण आरोग्य केंद्राचा स्टाफ उपस्थित होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ट्रान्सफॉर्मेशन फोरमकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा दिमाखदार गौरव; विविध स्पर्धा परीक्षांत यश मिळवणाऱ्यांचा सत्कार

ट्रान्सफॉर्मेशन फोरमकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा दिमाखदार गौरव; विविध स्पर्धा परीक्षांत यश मिळवणाऱ्यांचा सत्कार ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमच्या वतीने कै. डॉ. बी....

ट्रॅक्टर अनुदानासाठी ३ हजारांची लाच मागणाऱ्या कृषी अधिकाऱ्यावर एसीबीची कारवाई

ट्रॅक्टर अनुदानासाठी ३ हजारांची लाच मागणाऱ्या कृषी अधिकाऱ्यावर एसीबीची कारवाई ✍️ नितीन करडे | पुणे प्रतिनिधी : ट्रॅक्टर अनुदानाचा प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी लाच मागणाऱ्या पंचायत समिती,...

पूर्व हवेलीत अवैध वाळू माफियांचा धुमाकूळ; प्रशासन झोपेत? नागरिकांचा संताप उसळला!

पूर्व हवेलीत अवैध वाळू माफियांचा धुमाकूळ; प्रशासन झोपेत? नागरिकांचा संताप उसळला! ✍️ नितीन करडे पुणे (प्रतिनिधी) : पूर्व हवेली परिसरात अवैध वाळू उपशाने पुन्हा डोके वर...

पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलाची उल्लेखनीय कामगिरी; दुहेरी सुवर्णपदकाची कमाई, प्रज्वल दाभाडे चे सर्वत्र कौतुक !

पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलाची उल्लेखनीय कामगिरी; दुहेरी सुवर्णपदकाची कमाई, प्रज्वल दाभाडे चे सर्वत्र कौतुक ! ✍️ नितीन करडे  पुणे, प्रतिनिधी : महाराष्ट्रात झालेल्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत इंदापूर...

कबुतरांच्या वादातून तरुणाचा खून; खंडणी विरोधी पथक २ ची कारवाई, चार आरोपी अटकेत

कबुतरांच्या वादातून तरुणाचा खून; खंडणी विरोधी पथक २ ची कारवाई, चार आरोपी अटकेत ✍️ नितीन करडे | पुणे (प्रतिनिधी) : हडपसर परिसरात कबुतरांच्या वादातून एका तरुणाचा...

error: Content is protected !!