Homeक्राईमफेरफटका मारणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ४.१२ लाखांचे दागिने लुटण्याचा प्रयत्न; धाडसी पती-पत्नीमुळे चोर...

फेरफटका मारणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ४.१२ लाखांचे दागिने लुटण्याचा प्रयत्न; धाडसी पती-पत्नीमुळे चोर अटकेत!

फेरफटका मारणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ४.१२ लाखांचे दागिने लुटण्याचा प्रयत्न; धाडसी पती-पत्नीमुळे चोर अटकेत!

✍️ नितीन करडे |

उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथे सकाळच्या फेरफटक्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे सोन्याचे दागिने मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्याने हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र पती-पत्नीच्या धाडसामुळे चोराला पकडण्यात यश आले असून त्याला उरुळी कांचन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील भरत लक्ष्मण काळे (वय ५१) व त्यांची पत्नी जयश्री भरत काळे (वय ४३) हे सोमवार (दि.१६ मार्च) रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे एम.जी. रोड परिसरात सकाळचा फेरफटका मारत होते. यावेळी लोणारी नगर परिसरात समोरून मोटरसायकलवरून आलेल्या एका अल्पवयीन रा कामशेत (ता. मावळ, पुणे) या चोरट्याने जयश्री काळे यांच्या गळ्यातील सुमारे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे किंमत (४,१२,५००/-रु, चार लाख बारा हजार पाचशे) रुपये किमतीचे दागिन्याचा ऐवज हिसकावण्याचा प्रयत्न केला. घटना घडताच भरत काळे व जयश्री काळे यांनी प्रसंगावधान राखत चोरट्याचा पाठलाग सुरू केला. भरत काळे यांनी मोटरसायकलच्या मागील बाजूला पकडण्याचा प्रयत्न केल्याने मोटरसायकल घसरून पडली. त्यानंतर चोरट्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणतेही हत्यार असण्याची शक्यता असतानाही भरत काळे यांनी धाडस दाखवत चोराचा पाठलाग करून त्याला पकडले.

दरम्यान परिसरातील नागरिकही घटनास्थळी जमा झाले. पोलीस विजय कांचन व नागरिकांच्या मदतीने चोराला व दागिने उरुळी कांचन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती भरत काळे यांनी दिली. उरुळी कांचन परिसरात यापूर्वीही दागिने हिसकावण्याच्या अनेक घटना घडल्या असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी उरुळी कांचन यात्रेदरम्यान एका लहान मुलाच्या गळ्यातील सोन्याचा दागिना चोरण्याचा प्रयत्न करताना एका चोराला नागरिकांनी पकडल्याची घटना घडली होती.

तसेच गेल्या काही दिवसांपासून परिसरात अतिवेगाने फिरणाऱ्या दुचाकींबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली होती. या घटनेमुळे सकाळी फेरफटका मारणाऱ्या नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पती-पत्नीने दाखवलेल्या धाडसाचे परिसरात सर्वत्र कौतुक केले जात आहे.

[मी स्वतः पोलीस स्टेशनशी संपर्क साधून उरुळी कांचन परिसरात महिलांच्या गळ्यातील सोने हिसकवण्याबाबत तसेच उरुळी कांचन परिसरात संशयित अतिवेगाची दुचाकी वारंवार फिरत असल्याची माहिती दिली होती. यापूर्वीही उरुळी कांचन परिसरात भरदिवसा अनेक महिलांच्या दागिन्यांच्या चोऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने ग्रस्त वाढवाव्यात]

 – संतोष आबासो कांचन, मा. नियोजन समिती सदस्य पुणे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचऱ्याचे साम्राज्य हटले; ‘पुणे बुलेटिन न्यूज’च्या बातमीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून दखल!

कचऱ्याचे साम्राज्य हटले; ‘पुणे बुलेटिन न्यूज’च्या बातमीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून दखल ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) गावाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर मोठ्या प्रमाणात...

विवेक कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड; एम.पी.एस.सी.परीक्षेत यश..

विवेक कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड; एम.पी.एस.सी.परीक्षेत यश.. -- ✍️ विजय लोखंडे  वाघोली प्रतिनिधी : लोणीकंद गावचे सुपुत्र विवेक दत्तात्रय कंद यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)...

उरुळी कांचनच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य; कचरा व दुर्गंधीला नागरिक हैराण !

उरुळी कांचनच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य; कचरा व दुर्गंधीला नागरिक हैराण!   उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरून उरुळी कांचन (ता. हवेली) गावात प्रवेश करा किंवा रेल्वेच्या...

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीत...

पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू

पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू ✍️ नितीन करडे केडगाव (ता. दौंड) : लातूरहून पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने...

error: Content is protected !!