Homeताज्या बातम्याअवैध व्यावसायिकांच्या मुस्क्या आवळण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचा नवा उपक्रम

अवैध व्यावसायिकांच्या मुस्क्या आवळण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचा नवा उपक्रम

नितीन करडे

अवैध व्यावसायिकांच्या मुस्क्या आवळण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी नवा उपक्रम राबवला आहे.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे नागरिकांना आवाहन ज्या ठिकाणी अवैध धंदे चालू असतील त्यांची माहिती या व्हाट्सअप नंबर वर 9922892100 द्यावी.

समाजातील नागरीकांना आपला दिनक्रम तसेच जीवन शांततेत, सुव्यवस्थेत व्यतित करण्यास मिळावे या दृष्टीकोनातून पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक, पंकज देशमुख यांनी ” व्हॉट्सॲप दक्ष प्रणाली ” हा नवीन उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.

सध्याचे कालावधीत मोबाईल हा मनुष्याचे जीवनातील एक अविभाज्य घटक झालेला असून याच मोबाईल मधील सोशल मिडीयाचा वापर करून नागरीकांना आपली तक्रार करणे सुलभ होणार आहे. बऱ्याच सुजाण, जागरूक नागरीकांना आजुबाजूला अगर परिसरात असणारे अवैध धंद्यांविषयी तक्रार करावयाची असते, परंतु प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला जावून तक्रार देण्यासाठी त्यांना शक्य होत नाही अगर भिती वाटत असते. त्यामुळे नागरीकांनी पोलीस स्टेशनला न जाता, आहे त्या ठिकाणाहून मोबाईल मधील ” व्हॉट्स अॅप ” या सोशल मिडीया अॅपचा वापर करून अवैध धंदे व्यवसाय विषयीची तक्रार/माहिती पुणे ग्रामीण पोलीसांना देणे सोयीचे व सुलभ व्हावे याकरीता पंकज देशमुख पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे संकल्पनेतून ” व्हॉट्सअॅप दक्ष प्रणाली ” उपक्रमांतर्गत 9922892100 असा व्हॉट्सअॅप मोबाईल नंबर पुरविण्यात येत आहे.

व्हाट्सॲप वर माहिती कशी पाठवावी…

नागरीकांनी 9922892100 हा मोबाईल नंबर आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून या मोबाईल नंबरचे व्हॉट्स अॅप वर सुरूवातीस Hi असा शब्द/मेसेज पाठवून चॅटींग सूरू करावे. सदर मोबाईल नंबरवरील व्हॉट्स अॅप हे स्वयंचलित असल्याने त्यावरून आपणास प्रतिसाद मिळेल व पुढील पर्याय सुचविण्यात येतील. सदरची प्रणाली ही मराठी मध्ये असून अगदी सोप्या पद्धतीने तिचा वापर करता येणार आहे. या प्रणाली द्वारे नागरीकांना आपले परिसरातील अवैध धंदे / अवैध व्यवसायाविषयीच्या तक्रारी पोलीसांना देताना त्यामध्ये अवैध व्यवसाय असलेल्या ठिकाणाचे नाव, अवैध व्यवसाय करणाराचे नाव, फोटो, लोकेशन अशी माहिती देता येणार आहे. सदरचे ठिकाणाबाबत संबंधित पोलीस स्टेशन व पोलीस उपविभागाचे नाव नोंदविणे आवश्यक राहणार आहे. ही सर्व प्रक्रीया प्रणालीद्वारे स्वयंचलित असून तक्रारदार यांचा मोबाईल नंबर तसेच त्यांचे नाव हे पुर्णतः गोपनीय राहणार आहे.

पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे वतीने ” व्हॉट्सअॅप दक्ष प्रणाली ” उपक्रमांतर्गत 9922892100 हा व्हॉट्सअॅप मोबाईल नंबर नागरीकांसाठी प्रसारीत करून या प्रणालीचा शुभारंभ करणेत आला आहे. या प्रसंगी पंकज देशमुख पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक पुणे व बारामती विभाग तसेच इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.

पुणे ग्रामीण जिल्हयातील सर्व नागरीकांनी आपापले तसेच आजूबाजूचे परिसरातील अवैध धंदे / अवैध व्यवसायांची माहिती ” व्हॉट्सअॅप दक्ष प्रणाली ” उपक्रमांतर्गत पुरविणेत आलेल्या 9922892100 या व्हॉट्सअॅप मोबाईल नंबरवर द्यावी, जेणेकरून अवैध धंद्यांचे / अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन करणेकरीता पुणे ग्रामीण पोलीसांना सहकार्य होईल, असे आवाहन पंकज देशमुख पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी! ✍️ नितीन करडे पुणे : गणेशोत्सवाच्या काळात तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतील...

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी ; उरुळी कांचन पोलिसांचा कर्कश्य बुलेट स्वरांवर चाप ! ✍️ नितीन...

error: Content is protected !!