Homeक्राईमसासवड पोलिस ठाण्यातील हवालदारावर लाचप्रकरणी एसीबीची कारवाई 

सासवड पोलिस ठाण्यातील हवालदारावर लाचप्रकरणी एसीबीची कारवाई 

सासवड : तक्रारदाराकडून लाच मागितल्याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस हवालदारावर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली आहे. याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास लक्ष्मण ओमासे (वय ३९, पोलिस हवालदार) असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे. तक्रारदार हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत असून तक्रारदार व त्यांच्या वडिलांविरुद्ध सासवड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एन.सी. प्रकरणात कारवाई न करता मदत करण्यासाठी आरोपी हवालदाराने सुरुवातीस ३ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार २४ डिसेंबर २०२५ रोजी एसीबी पुणे येथे दाखल करण्यात आली होती.

तक्रारीच्या अनुषंगाने ३ जानेवारी २०२६ रोजी एसीबीने लाच मागणीची पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान आरोपीने सुरुवातीस १० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर ५ हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आरोपी विकास ओमासे यांना ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी सासवड पोलिस ठाणे, पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर तर तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे काम पाहत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील व अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाच मागत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वीर यात्रेदरम्यान महावितरणचा गलथान कारभार; बत्ती गुलमुळे भक्त संतप्त

वीर यात्रेदरम्यान महावितरणचा गलथान कारभार; बत्ती गुलमुळे भक्त संतप्त ✍️नितीन करडे पुणे : वीर (ता पुरंदर) ता. 11 फेब्रुवारी रोजी वीर येथे यात्रेचा उत्साह सुरू असतानाच...

स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी ✍️नितीन करडे उरुळी कांचन : पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन समोरील...

पूर्व हवेलीतील पंचायत समिती व जिल्हा परिषद मतदान गोंधळात

पूर्व हवेलीतील पंचायत समिती व जिल्हा परिषद मतदान गोंधळात ✍️ नितीन करडे पुणे : पूर्व हवेलीतील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान काही गावांमध्ये मतदान प्रक्रियेत...

ब्रेकिंग न्यूज धक्कादायक! पूर्व हवेलीतील पंचायत समिती उमेदवाराच्या घरावर हल्ला

ब्रेकिंग न्यूज धक्कादायक! पूर्व हवेलीतील पंचायत समिती उमेदवाराच्या घरावर हल्ला ✍️नितीन करडे पुणे : पूर्व हवेली तालुक्यातील पेठ गाव येथे राहणारे पंचायत समितीचे उमेदवार यांच्या राहत्या घरावर...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा रूट मार्च

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा रूट मार्च ✍️नितीन करडे उरुळी कांचन (ता. हवेली) : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित...

error: Content is protected !!