Homeशिक्षण-प्रशिक्षणशेतकरी कुटुंबातील नामदेव खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड; जिद्द आणि मेहनतीची...

शेतकरी कुटुंबातील नामदेव खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड; जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी!

शेतकरी कुटुंबातील नामदेव खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड; जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी
✍️नितीन करडे 

पुणे (प्रतिनिधी): जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर शेतकरी कुटुंबातील नामदेव श्रीमंत खैरे यांनी उल्लेखनीय यश संपादन करत महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून, विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ग्रामीण भागातील अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या नामदेव खैरे यांनी प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची वाट न सोडता सातत्याने आपल्या ध्येयासाठी प्रयत्न केले. आर्थिक अडचणी, स्पर्धा परीक्षेचा ताण आणि मर्यादित साधने यांचा सामना करत त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित ठेवले. कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी हे यश मिळवत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

विशेष म्हणजे, नामदेव खैरे यांनी यापूर्वी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचे अंगरक्षक म्हणून काम केले होते. या काळात त्यांना पोलीस प्रशासनाची कार्यपद्धती जवळून समजली तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याच अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा उपयोग करून त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी अधिक प्रभावीपणे केली.

“लक्षवेधी बाब म्हणजे, संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेले दोन्ही अंगरक्षक नामदेव श्रीमंत खैरे आणि युवराज गोपाळ धोंडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली आहे. या दोघांनीही आपल्या यशाचे श्रेय संदीप पाटील यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाला दिले आहे.” 

सध्या नामदेव खैरे हे पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. नोकरी सांभाळत त्यांनी अभ्यास सुरू ठेवला आणि अखेर PSI पद मिळवत त्यांनी आपल्या मेहनतीचे चीज केले. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीयांचा अभिमान वाढला असून, गावकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

नामदेव खैरे यांचा हा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास अनेक तरुणांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. “परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते,” हा संदेश त्यांच्या यशातून स्पष्टपणे दिसून येतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले..”आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन”

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले.."आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन" वाडेबोल्हाई/पुणे:विजय लोखंडे कोपर्डी(ता.कर्जत) येथे आदर्श शिक्षक किसन काळूराम चव्हाण (वय ५६) यांचे गुरुवार,दि.६...

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास! पांगारे वस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार कोयता घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी...

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल!

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर 'मोक्का' अंतर्गत गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे पुणे : कोंढवा परिसरात अवैध गांजा विक्री करून दहशत निर्माण करणाऱ्या...

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हिंजवडी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत घडलेल्या खूनप्रकरणातील आरोपीला...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन घरमालकांवर गुन्हे ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे ग्रामीण दहशतवाद...

error: Content is protected !!