भर दिवसा उरुळी कांचन येथे दोन ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरट्यांनी केले लंपास
” उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा चेन स्कॅनिंग सक्रिय “
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन (ता. हवेली) येथे (ता. 01 सप्टेंबर) रोजी भर दिवसा दोन ठिकाणी महिलेंच्या गळ्यातील दागिने चोरट्यांनी लंपास केले असल्याची घटना उघडकीस आले आहे. एका ठिकाणचा सीसीटीव्ही समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान इरिगेशन कॉलनी येथे एका मोटरसायकल वरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी कामाला जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचा सोन्याचा दागिना हिसकावून लंपास केलं असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तर दुसरी घटना ही उरुळी कांचन येथील श्रीकृष्ण मंदिरासमोर एका महिलेचे दागिने त्याच दोन अज्ञातांनी लंपास केले असल्याचेही माहिती समोर आली आहे. असा दोन लाखांच्या दरम्यान किंमतीचे दोन तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे.























