Homeताज्या बातम्यापुणे–सोलापूर महामार्गावर मृत्यूला निमंत्रण! विरुद्ध दिशेने धावणाऱ्या बलकरने नागरिकांचा जीव घातला धोक्यात...

पुणे–सोलापूर महामार्गावर मृत्यूला निमंत्रण! विरुद्ध दिशेने धावणाऱ्या बलकरने नागरिकांचा जीव घातला धोक्यात ; महामार्ग की मृत्यूचा सापळा?

पुणे–सोलापूर महामार्गावर मृत्यूला निमंत्रण! विरुद्ध दिशेने धावणाऱ्या बलकरने नागरिकांचा जीव घातला धोक्यात ; महामार्ग की मृत्यूचा सापळा?

✍️नितीन करडे

पुणे–सोलापूर महामार्गावर सोमवारी (ता. ५) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर सिमेंट बलकर ट्रक (एम एच १२ – एच डी – ३२१८) हा तब्बल बारा टायरचा अवजड ट्रक थेट विरुद्ध दिशेने महामार्गाच्या मधूनच सुसाट धावत होता. या ट्रकने तीन ते चर किलोमीटर अंतर विरुद्ध दिशेने प्रवास करत महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांचा थरकाप उडवला. विशेष म्हणजे ज्या दिशेने चालकाला जायचे होते त्या दिशेने वाहतूक मोकळी असतानाही, चालकाने मुद्दाम विरुद्ध मार्ग निवडल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे.

महामार्गाच्या मधोमध विरुद्ध दिशेने धावणारा हा अवजड बलकर म्हणजे मृत्यूला उघड आमंत्रण होते. क्षणभर जरी नियंत्रण सुटले असते, तर मोठी जीवितहानी अटळ होती. अनेक दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक जीव मुठीत धरून बाजूला सरकत आपला जीव वाचवत होते.

बलकर ट्रक आणि छोटा हत्ती टेम्पो एवढ्या बेधडकपणे मृत्यूचा खेळ कसा खेळू शकतात?

प्रश्न असा आहे की, महामार्गावर इतका गंभीर प्रकार घडत असताना वाहतूक पोलिस व प्रशासन कुठे होते?

पुणे–सोलापूर महामार्गावरील वाहतुकीची भीषण आणि धोकादायक वास्तवता पुन्हा एकदा समोर 

महामार्ग की मृत्यूचा रस्ता? दोन्ही अवजड वाहने विरुद्ध दिशेने सुसाट पहा व्हिडीओ मध्ये..

महामार्गाच्या मधोमध बारा टायर बलकर ट्रक व साईट पट्ट्या वरून माल वाहतूक छोटा हत्ती एकाच वेळी महामार्गावरून दोन वाहने विरुद्ध दिशेने सुसाट धावणारा असा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतून महामार्गावर नियमांची खुलेआम पायमल्ली होत असल्याचे स्पष्ट दिसून येते. क्षणभर जरी वाहनांचा वेग नियंत्रणाबाहेर गेला असता, तर मोठा अपघात आणि जीवितहानी अटळ होती. हा प्रकार उरुळी कांचन परिसरात घडला असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर संतप्त नागरिकांकडून संबंधित ट्रक चालकावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे. अन्यथा असे प्रकार पुन्हा घडून निष्पाप नागरिकांचे बळी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वीर यात्रेदरम्यान महावितरणचा गलथान कारभार; बत्ती गुलमुळे भक्त संतप्त

वीर यात्रेदरम्यान महावितरणचा गलथान कारभार; बत्ती गुलमुळे भक्त संतप्त ✍️नितीन करडे पुणे : वीर (ता पुरंदर) ता. 11 फेब्रुवारी रोजी वीर येथे यात्रेचा उत्साह सुरू असतानाच...

स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी ✍️नितीन करडे उरुळी कांचन : पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन समोरील...

पूर्व हवेलीतील पंचायत समिती व जिल्हा परिषद मतदान गोंधळात

पूर्व हवेलीतील पंचायत समिती व जिल्हा परिषद मतदान गोंधळात ✍️ नितीन करडे पुणे : पूर्व हवेलीतील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान काही गावांमध्ये मतदान प्रक्रियेत...

ब्रेकिंग न्यूज धक्कादायक! पूर्व हवेलीतील पंचायत समिती उमेदवाराच्या घरावर हल्ला

ब्रेकिंग न्यूज धक्कादायक! पूर्व हवेलीतील पंचायत समिती उमेदवाराच्या घरावर हल्ला ✍️नितीन करडे पुणे : पूर्व हवेली तालुक्यातील पेठ गाव येथे राहणारे पंचायत समितीचे उमेदवार यांच्या राहत्या घरावर...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा रूट मार्च

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा रूट मार्च ✍️नितीन करडे उरुळी कांचन (ता. हवेली) : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित...

error: Content is protected !!