Homeसामाजिकटिळेकरवाडीत नवीन पोस्ट ऑफिसचे उद्घाटन उत्साहात संपन्न!

टिळेकरवाडीत नवीन पोस्ट ऑफिसचे उद्घाटन उत्साहात संपन्न!

टिळेकरवाडीत नवीन पोस्ट ऑफिसचे उद्घाटन उत्साहात संपन्न
अवघ्या आठ दिवसांत १०११ खाती उघडण्याची उल्लेखनीय कामगिरी; विविध पोस्टल योजनांची नागरिकांना माहिती
✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : टिळेकरवाडी (ता. हवेली) : हवेली तालुक्यातील टिळेकरवाडी येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. पुणे ग्रामीण डाक सेवाचे सहाय्यक अधीक्षक (ASI) सुखदेव मोरे यांच्या हस्ते व गावचे सरपंच सुशील राऊत यांच्या शुभहस्ते या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन राजेंद्र टिळेकर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी टिळेकरवाडीचे माजी सरपंच सुभाष लोणकर यांनी प्रास्ताविकातून गावातील विकासकामांचा आढावा घेतला. तसेच टिळेकरवाडीत पोस्ट ऑफिस सुरू करण्यासाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या पोस्ट विभागातील अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

उद्घाटनप्रसंगी सहाय्यक अधीक्षक सुखदेव मोरे यांनी पोस्ट विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध बचत, गुंतवणूक व विमा योजनांची सविस्तर माहिती उपस्थित नागरिकांना दिली. टिळेकरवाडीतील विकासकामांचे कौतुक करत त्यांनी समाधान व्यक्त केले. आपल्या विभागात सुरू झालेल्या पोस्ट ऑफिसपैकी अवघ्या आठ दिवसांत १०११ खाती उघडणारे टिळेकरवाडी हे एकमेव पोस्ट ऑफिस कार्यालय असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.

यावेळी माजी सरपंच शांताराम टिळेकर यांनी नव्या पोस्ट ऑफिसमध्ये पहिल्याच दिवशी ₹१,००,००० (एक लाख रुपये) ठेव जमा करून नागरिकांसमोर बचतीचा आदर्श ठेवला. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र टिळेकर यांनी उपस्थित सर्व विद्यमान व माजी सरपंचांचे स्वागत केले. त्यांनी गावाच्या विकासातील योगदानाची आठवण करून देत जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि सर्व मान्यवरांचा सन्मान केला.

या कार्यक्रमाला खामगाव टेकचे विद्यमान उपसरपंच बाळासाहेब थोरात, माजी सरपंच संतोष टिळेकर, उपसरपंच कल्पना टिळेकर, माजी सरपंच गोवर्धन टिळेकर, गणेश टिळेकर, सुषमा टिळेकर, नंदा राऊत, वैशाली चौरे, प्रियंका कांबळे, टिळेकरवाडीचे पोलीस पाटील विजयराव टिळेकर, खामगाव टेकच्या पोलीस पाटील तनुजा थोरात, माजी सरपंच शांताराम टिळेकर, रोहिणी जगताप, बापूसाहेब ताम्हणे, कमल टिळेकर, सारिका थोरात, पुष्पा टिळेकर, माजी उपसरपंच दत्ता थोरात, प्रेमजी थोरात, सुभाष टिळेकर, अक्षय टिळेकर, विनोद बेंगळे, रोहन कांबळे तसेच पोस्ट ऑफिसचे सय्यद व त्यांची संपूर्ण टीम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोस्ट ऑफिस सुरू करण्यासाठी व अल्पावधीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोस्ट विभागाच्या संपूर्ण टीमचे गावाच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच सुशील राऊत यांनी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान अवचट यांनी प्रभावीपणे केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास! पांगारे वस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार कोयता घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी...

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल!

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर 'मोक्का' अंतर्गत गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे पुणे : कोंढवा परिसरात अवैध गांजा विक्री करून दहशत निर्माण करणाऱ्या...

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हिंजवडी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत घडलेल्या खूनप्रकरणातील आरोपीला...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन घरमालकांवर गुन्हे ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे ग्रामीण दहशतवाद...

मिरवडी ग्रामपंचायतीत सायबर जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद!

मिरवडी ग्रामपंचायतीत सायबर जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद क्विक हील फाउंडेशनच्या 'सायबर शिक्षणातून सायबर सुरक्षा' उपक्रमांतर्गत नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : वाढत्या...

error: Content is protected !!