पुणे प्रतिनिधी
शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी आरणगाव येथील गावभेटीत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या दौऱ्यानिमित्त उपस्थित राहत प्रदीप कंद यांनी ही नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना प्रदीप कंद यांनी सांगितले कि भाजप महायुती सरकार च्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. पुढील काळात मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी महायुतीला मतदान करुन महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांना आपल्याला भहुमताने विजयी करुन निवडून आणायचं आहे.
