नितीन करडे
उरुळी कांचन (ता. हवेली) येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त मृत्युंजय प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबीर व भव्य मिरवणूक सोहळा पार पडला. यात मृत्युंजय प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी ता. १४ मे रोजी पाटील वाडा येथे सालाबादप्रमाणे रक्तदान घेण्यात आले. त्यावेळी शंभर हुन अधिक शंभू भक्तांनी रक्तदान केले. यावेळी तरुणांनी छञपती संभाजी महाराजांना अभिवादन केले. व रक्तदात्यांना भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. गुरुवार १५ मे रोजी सांयकाळी सात वाजण्याच्या दरम्यान मणिभाई पतसंस्थे पासून मिरवणूक सुरवात झाली व एम जी रोडने तळवाडी चौका पर्यंत संपन्न झाली.
यावेळी मृत्युंजय प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश उत्तम कांचन, दौंड तालुक्याचे आमदार राहुल दादा कुल, राष्ट्रवादी हवेली तालुका अध्यक्ष दिलीप नाना वाल्हेकर, माजी सरपंच अमित बाबा कांचन, संतोष कांचन, दत्तात्रय कांचन, राजेंद्र कांचन, शिरुर हवेली चे आमदार माऊली आबा कटके यांचे बंधु अनंता कटके यांनी ही कार्यक्रमाला भेट दिली. तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन, माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष कांचन, उद्योजक सोमनाथ काळुराम कांचन, रविंद्र गायकवाड, अजिंक्य कांचन, शरद गोते, संदेश कटके, प्रसाद शिंदे, प्रतीक शेवाळे, अमोल चौधरी, ग्रा. सदस्य सुनील आबा तांबे, भाजपा शहर अध्यक्ष अमित कांचन, तसेच मृत्युंजय प्रतिष्ठान चे कार्यकर्ते व आदी ग्रामपंचायत सदस्य व आजी माजी पधादिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
