नितीन करडे
उरुळी कांचन परिसरात भर दिवसा गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीत वाढ झाली असुन दागिने घालणाऱ्या महिलांनी धास्ती घेली आहे. गेल्या ३ तारखेला उरुळी कांचन येथील बाजार चौकात चोरट्यांनी एका वृद्ध महिलेचे गळ्यातील दागिने लंपास केले तर सहा दिवसा पुर्वी कब्रस्तान येथील एका महिलेची अंगठी लंपास केली तर
” भर दिवसा, गर्दीच्या ठिकाणी होते महिलांच्या दागिन्याची लुट,पोलीस प्रशासनाच्या कारवाई कडे नागरिकांचे लागेले लक्ष ”
चोर मात्र चांगलेच सोकवले नागरिकांची चर्चा
आज सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान पुणे सोलापूर महामार्गावरील इरिगेशन कॉलनीच्या परिसरात एका मोटरसायकल वरून आलेल्या दोन जणांनी चौकातुन सत्संग कार्यक्रमासाठी निघालेल्या दोन महिलांच्या गळ्यावर हात मारला पण हाती काही न लागल्याने त्या चोरट्यांनी पुढे समोर एक वृद्ध महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे दागिने लंपास केले असल्याची घटना घडली आहे.या घटनांमुळे उरुळी कांचन परिसरातील महिलांनी चोरट्यांची चांगलीच जास्ती घेतली आहे.
