(ता. हवेली) येथील तळवाडी चौक येथे एका महिलेला डंपरने चिरडले असल्याची घटना सोमवार (ता. १६ जुन) रोजी, दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रमिला अशोक गोळे, (वय ५० वर्ष रा.गोळे वस्ती) उरुळी कांचन पुणे,असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. हि महिला रस्ता ओलांडताना उरुळी कांचन वरुन यवत च्या दिशेने (एम एच १२ टी व्ही ३७०२) हा डंभर निघाला होता. या डंपरने महिलेला धक्का दिल्याने महिला डंभर खाली आली. त्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. असुन डंफर चालक पांडुरंग सांवत (वय ४३ रा. पाटीलवाडा उरुळी कांचन) याला उरुळी कांचन पोलीसांनी ताब्यात घेतले असुन पुढील तपास पोलीस करत आहेत.























