Homeताज्या बातम्यागाडीचा ‘जॅमर’ काढण्यासाठी मागितली लाच; सहायक फौजदारासह, वॉर्डनवर गुन्हा दाखल

गाडीचा ‘जॅमर’ काढण्यासाठी मागितली लाच; सहायक फौजदारासह, वॉर्डनवर गुन्हा दाखल

पुणे प्रतिनिधी : नो पार्किंगमध्ये लावलेल्या गाडीच्या चाकाला लावलेला जॅमर काढण्यासाठी एक हजारांची लाच मागणार्‍या वाहतूक शाखेतील सहायक फौजदारा सह वॉर्डनविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही समर्थ वाहतूक विभागात कार्यरत आहेत. सहायक पोलीस फौजदार किरण दत्तात्रय रोटे (वय ५१वर्ष ), ट्रॅफिक वॉर्डन अनिस कासम आगा (वय ४८ वर्ष , रा. कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका वाहनचालकाने फिर्याद दिली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली. समर्थ वाहतूक विभागांतर्गत येणार्‍या रस्त्यावरील नो पार्किंगमध्ये तक्रारदाराने त्यांचे वाहन लावले होते. त्यामुळे वाहतूक विभागाने त्यांच्या वाहनाला जॅमर लावला. जॅमर काढण्यासाठी समर्थ वाहतूक विभागातील (वाहतूक मदतनीस) ट्रफिक वॉर्डन अनिस आगा याने तक्रारदाराकडे १ हजार रुपयांची लाच मागितली होती . याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली होती.

एसीबीने याची पडताळणी केली. त्यामध्ये वॉर्डन अनिस याने एक हजारांची लाच मागून तडजोडीत सातशे रूपये स्विकारण्याचे मान्य केले.  अनिस हा कार्यालयात उपस्थित नसताना तक्रारदार समर्थ वाहतूक विभागाच्या कार्यालयात गेले. त्यावेळी सहायक फौजदार रोटे यांनी अनिसने मागितलेले पैसे माझ्याकडे दे, असे म्हणून लाच घेण्यास संमती दर्शविली. त्यानूसार एसीबीने वॉर्डन अनिस आणि सहायक फौजदार रोटे यांच्यावरती भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. एसीबीचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोणी स्टेपनी देता का ओ स्टेपनी ….. एस टी महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे तीन तास...

✍️नितीन करडे पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) येथे तीन तासाहुन अधिक वेळ एसटी पंचर झालेल्या अवस्थेत होती. एसटी बार्शी डेपोची असुन स्वारगेट ला...

पावसाच्या पाण्यामुळे पुणे सोलापूर महामार्गावर तळ्याचे स्वरूप: अपघातास निमंत्रण 

✍️नितीन करडे उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पुणे सोलापूर महामार्गावर पावसाच्या पाण्यामुळे तळ्याचे स्वरूप आले. असुन अपघातास निमंत्रण अशी परस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आहे....

मायक्रोसॉफ्टच्या एक्सबॉक्स हँडहेल्ड कन्सोल ‘मूलत: रद्द’, एक्सबॉक्स सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मवर काम करण्यासाठी कंपनी: अहवाल द्या

मायक्रोसॉफ्टचा एक्सबॉक्स हँडहेल्ड गेमिंग कन्सोल, जो पुढील काही वर्षांत लॉन्च करण्याची अफवा पसरला होता, तो रद्द करण्यात आला आहे. एएसयूएसने आरओजी एक्सबॉक्स अ‍ॅलीचे अनावरण...

error: Content is protected !!