Homeसामाजिकउरुळी कांचन परिसरात दत्त जयंती उत्साहात साजरी; हजारो भाविकांनी घेतला दर्शन व...

उरुळी कांचन परिसरात दत्त जयंती उत्साहात साजरी; हजारो भाविकांनी घेतला दर्शन व महाप्रसादाचा लाभ

✍️नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : पुर्व हवेलीतील उरुळी कांचन परिसरात गुरुवार (ता. ४ डिसेंबर) रोजी दत्त जयंतीचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. उरुळी कांचन, कोरेगाव मूळ, टिळेकरवाडी, भवरापूर, शिंदवणे, वळती, डाळिंब, नायगाव, पेठ, सोरतापवाडी तसेच परिसरातील अनेक गावांत दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, पालखी सोहळे आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दत्त महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच हजारो भाविकांची गर्दी होत होती. भक्तांनी दर्शन घेतल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला असून यावर्षी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी महिलांनी, युवकांनी आणि स्थानिक सामाजिक संस्थांनी भक्तनिवास, पाण्याची व्यवस्था आणि विविध सेवा सुरू ठेवल्या.

उरुळी कांचन पोलीस स्टेशन, कस्तुरी ग्रुप, दत्तवाडी, दत्तनगर, बगाडे वस्ती, बस स्टॉप-रिक्षा स्टॅन्ड, तळवाडी सहा-सीटर स्टॅन्ड, तुपे वस्ती आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन केले गेले. यात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

पोलीस स्टेशनतर्फे पालखी सोहळा-

सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या वतीने दत्त जयंती निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा” या गजरात पालखीची गाव प्रदक्षिणा संपन्न झाली.

भक्तिमय वातावरणाने परिसर दुमदुमला, सामाजिक संस्था आणि स्थानिक मंडळांनीही सोहळ्यात सक्रिय सहभाग नोंदविला. संपूर्ण परिसरात दत्तमय वातावरण निर्माण झाले होते. दिवसभर धार्मिक कार्यक्रम, भजने, दत्त जयंतीचे संदेश आणि भक्तीभावाची उर्मी पाहायला मिळाली.

उरुळी कांचन परिसरातील दत्त जयंतीचा हा उत्सव यशस्वीपणे पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन, ग्रामस्थ, सामाजिक संस्था आणि विविध मंडळांनी विशेष प्रयत्न केल्याचे दिसून आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा सांस्कृतिक सोहळा ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचनचे...

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक!

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक ✍️ नितीन करडे पुणे : आजी-माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देणे आणि त्यांच्या विविध अडचणी जाणून...

पेरणेत दीड महिन्यांपासून बंद असलेले वीज रोहीत्र (डिपी) ४८ तासात बसवले!

पेरणेत दीड महिन्यांपासून बंद असलेले वीज रोहीत्र(डिपी) ४८ तासात बसवले. प्रदिप वसंत कंद यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लोणीकंद प्रतिनिधी : पेरणे (ता.हवेली) येथे विजय रणस्तंभ...

पुणे-सोलापूर महामार्गावर पाठलाग करून एनडीपीएस गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक; अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे...

पुणे-सोलापूर महामार्गावर पाठलाग करून एनडीपीएस गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक; अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे शाखेची कारवाई ✍️ नितीन करडे पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे...

शिरूरमध्ये सलग दुसरी एनडीपीएस कारवाई; २० ग्रॅम एमडीसह स्कॉर्पिओ जप्त, दोघे ताब्यात!

शिरूरमध्ये सलग दुसरी एनडीपीएस कारवाई; २० ग्रॅम एमडीसह स्कॉर्पिओ जप्त, दोघे ताब्यात ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : शिरूर परिसरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे...

error: Content is protected !!