Homeमहत्त्वाचेउरुळी कांचनचा अभिमान! नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये निर्माण अकॅडमीचे 17 पैकी 17 विद्यार्थी...

उरुळी कांचनचा अभिमान! नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये निर्माण अकॅडमीचे 17 पैकी 17 विद्यार्थी पदकविजेते

✍️नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : दिल्लीच्या अलीपुर येथे झालेल्या नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये उरुळी कांचन व पंचक्रोशीतील निर्माण अकॅडमीने अभूतपूर्व कामगिरी नोंदवली आहे. अकॅडमीतील एकूण 17 विद्यार्थी क्वालिफाय झाले होते आणि विशेष म्हणजे सर्व 17 विद्यार्थ्यांनी पदक पटकावत गावाचे नाव देशभरात झळकावले.

महाराष्ट्राच्या संघात विविध जिल्ह्यांमधील अनेक टीम सहभागी झाल्या असून एकूण मिळून महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळण्यात निर्माण अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा मोठा वाटा राहिला. उरुळी कांचनमधील विजयी विद्यार्थ्यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

निर्माण अकॅडमीचे संचालक व प्रशिक्षक संदीप कांचन, तसेच शकील शेख आणि फरदीन शेख यांच्या कठोर प्रशिक्षणामुळे ही ऐतिहासिक कामगिरी साध्य झाल्याचे पालक नानासो जगदाळे यांनी सांगितले. यातील एका स्पर्धकाचा, लोकेश उर्फ माऊली नानासो जगदाळे (भरतगाव) याचा विशेष सत्कार करण्यात आला. भरतगावातील सर्व ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

1) गोल्ड (Gold) मधील विद्यार्थी- 

फैजान शेख, शिवराज निकम, समर्थ कांचन, हरमन साठ

2) सिल्वर (Silver) मधील विद्यार्थी- 

लोकेश जगदाळे, विवेक पांडे, श्लोक कुंजीर, आयुष प्रसाद, आदित्य चव्हाण, श्रीवर्धन कदम, रितेश चव्हाण, श्रीतेज कांचन, आर्या भाटे      

3) ब्राँझ (Bronze) मधील विद्यार्थी-

सार्थक मचले, समर्थ मचले, सोहम शिंदे, यशराज बडेकर अशी विजेत्यांची नावे असुन यांनी उरुळी कांचन शहरासह निर्माण अकॅडमीचे नाव देशभरात झळकावले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे...

अखेर डाळिंब येथील खूनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपी जेरबंद ;यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे कामगिरी! ..किरकोळ शिवीगाळीच्या रागातून गळा दाबून खून केल्याची कबुली; मृतदेह...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल; शिक्षक...

सोरतापवाडी हद्दीतील एका विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल   उरुळी कांचन प्रतिनिधी : सोरतापवाडी (ता. हवेली) हद्दीतील माध्यमिक विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीशी...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

error: Content is protected !!