Homeसामाजिकउन्नत मार्गांच्या पार्श्वभूमीवर पीएमआरडीए आयुक्तांचा शिरूर-हवेली दौरा; आमदार माऊली कटके यांनी मांडल्या...

उन्नत मार्गांच्या पार्श्वभूमीवर पीएमआरडीए आयुक्तांचा शिरूर-हवेली दौरा; आमदार माऊली कटके यांनी मांडल्या विकासाच्या मागण्या

उन्नत मार्गांच्या पार्श्वभूमीवर पीएमआरडीए आयुक्तांचा शिरूर-हवेली दौरा; आमदार माऊली कटके यांनी मांडल्या विकासाच्या मागण्या
✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : : पुणे–सोलापूर व पुणे–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गांवरील प्रस्तावित उन्नत मार्ग (एलिव्हेटेड कॉरिडॉर) प्रकल्पामुळे भविष्यात निर्माण होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांच्या पुढाकाराने पीएमआरडीएचे आयुक्त अभिजित चौधरी यांनी विविध भागांचा प्रत्यक्ष दौरा करून पाहणी केली. या दौऱ्यात वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण, पर्यायी मार्गांची उभारणी तसेच विकासकामांना गती देण्याबाबत अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या.

हडपसर ते यवत तसेच विमाननगर ते शिरूर या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांवर उन्नत मार्गाचे काम पुढील चार वर्षे सुरू राहणार असल्याने वाहतुकीवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. यामुळे महामार्गालगतच्या अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण करून वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविण्याचा प्रस्ताव आमदार कटके यांनी पीएमआरडीएसमोर मांडला.

यावेळी साष्टे ते थेऊर दरम्यान मुठा नदीवरील प्रस्तावित पुलाला मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली. तसेच न्हावी सांडस ते विठ्ठलवाडी (शिरूर) या पुलाच्या कामालाही प्राधान्य देण्याची सूचना करण्यात आली. या पुलांमुळे वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असल्याचे आमदार कटके यांनी सांगितले.

दौऱ्यात आव्हाळवाडी, वाडेबोल्हाई, मांजरी खुर्द, थेऊर, प्रयागधाम, कोरेगाव, टाकळी भीमा, सनसवाडी, कोरेगाव भीमा, पिंपळे जगताप, लोणीकंद, भावडी, लोहगाव रस्ता, वाघेश्वर मंदिर परिसर, तुळापूर आणि बकोरी मार्ग या भागांची पाहणी करण्यात आली. या ठिकाणी वाहतूक कोंडीची कारणे, रस्त्यांची सद्यस्थिती, भविष्यातील वाहतूक नियोजन तसेच नागरिकांच्या विविध मागण्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

पूर्व हवेलीतील मोठ्या ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा व घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांचा एकात्मिक प्रकल्प राबविण्याची मागणीही आमदार ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांनी पीएमआरडीए आयुक्त अभिजित चौधरी यांच्याकडे केली. या प्रकल्पामध्ये पिण्याच्या पाण्याचे स्रोत, जलकुंभ, पाणी शुद्धीकरण व्यवस्था तसेच आधुनिक घनकचरा व्यवस्थापनाचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली.

वाहतूक, पायाभूत सुविधा आणि मूलभूत नागरी सुविधांच्या दृष्टीने शिरूर-हवेली मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश या पाहणी दौऱ्यात देण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुपे घाटात शाळकरी मुलांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सुपे घाटात शाळकरी मुलांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण ✍️ नितीन करडे सुपे : सुपे घाटातील चढावर शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस...

उरुळी कांचनमध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन; केरळचे पारंपरिक चेंडा वाद्य, ढोल-ताशांचा गजर अन् २५ डीजेंच्या...

उरुळी कांचनमध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन; केरळचे पारंपरिक चेंडा वाद्य, ढोल-ताशांचा गजर अन् २५ डीजेंच्या दणदणाटात आश्रम रोडवर हजारो भक्तांची गर्दी ✍️ नितीन करडे उरुळी कांचन :...

दहिहंडी उत्सवादरम्यान ‘किंग ऑफ दौंड’ रील; आयोजकांसह रेकॉर्डवरील आरोपींवर यवत पोलिसांचा कायदेशीर चाप!

दहिहंडी उत्सवादरम्यान ‘किंग ऑफ दौंड’ रील; आयोजकांसह रेकॉर्डवरील आरोपींवर यवत पोलिसांचा कायदेशीर चाप.. केडगाव येथे सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा आरोप; इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह रीलप्रकरणी...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा रूट मार्च!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा रूट मार्च प्रमुख चौक व मार्गांवर पोलिसांची प्रभावी उपस्थिती; नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : आगामी...

यवत पोलिसांकडून गिट्स कंपनीतील तांब्याची केबल चोरी करणारा आरोपी जेरबंद!

यवत पोलिसांकडून गिट्स कंपनीतील तांब्याची केबल चोरी करणारा आरोपी जेरबंद एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध |✍️ नितीन करडे | यवत पोलीस स्टेशन...

error: Content is protected !!