Homeमहत्त्वाचेआळंदी PMPML बस स्थानकात भीषण अपघात

आळंदी PMPML बस स्थानकात भीषण अपघात

बसच्या मागील चाकाखाली आल्याने अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू; परिसरात हळहळ

(✍️अर्जुन मेदनकर) 

आळंदी प्रतिनिधी :आळंदी येथील गजबजलेल्या PMPML बस स्थानकात सोमवार (दि. ११ मे) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. बस स्थानकात प्रवेश करीत असलेल्या PMPML बसच्या मागील चाकाखाली एक अज्ञात पुरुष आल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे बस स्थानक परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही दुर्घटना आळंदी नगरपरिषद बस स्थानक येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, PMPML बस स्थानकात प्रवेश करत असताना अचानक संबंधित व्यक्ती बसच्या मागील बाजूस आली आणि मागील चाकाखाली सापडल्याने गंभीर अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच आळंदी पोलीस स्टेशन तसेच दिघी-आळंदी वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची पाहणी करून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम केले. घटनेनंतर काही काळ बस स्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, पोलिसांकडून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृतदेह पुढील तपासणी आणि शवविच्छेदनासाठी YCM रुग्णालय येथे रुग्णवाहिकेद्वारे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास आळंदी पोलीस स्टेशन करीत आहे.

दरम्यान, आळंदीतील PMPML बस स्थानकाची जागा अत्यंत अपुरी असून येथे मोठ्या प्रमाणात भाविक, वारकरी आणि प्रवाशांची सतत गर्दी असते. त्यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर PMPML बस स्थानकाचे तातडीने एस.टी. स्टँडच्या प्रशस्त जागेत स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी भाविक आणि वारकरी यांच्याकडून जोर धरू लागली आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे आळंदी परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून प्रशासनाने बस स्थानकातील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचा विजय; रेणुका कांचन यांचे एलएलबीमध्ये प्रथम श्रेणीचे यश!

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचा विजय; रेणुका कांचन यांचे एलएलबीमध्ये प्रथम श्रेणीचे यश ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, प्रतिनिधी : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या बळावर...

दगडफेक, कोयता आणि दहशत; चंदननगर पोलिसांनी टोळीला काही तासातच चढवल्या बेड्या

दगडफेक, कोयता आणि दहशत; चंदननगर पोलिसांनी टोळीला काही तासातच चढवल्या बेड्या ✍️ नितीन करडे पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहती परिसरात हातात धारदार हत्यारे घेऊन दहशत...

उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; गुटखा, दारू, ताडी, मटका लपून-छपून जोमात!

उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; गुटखा, दारू, ताडी, मटका लपून-छपून जोमात! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यात विषारी हातभट्टी दारू प्रकरणात...

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलमधील...

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर ✍️ नितीन करडे पुणे : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या...

error: Content is protected !!