Homeमहत्त्वाचे५१ वी कोल्हापुर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ : पुणे ग्रामीणमध्ये भव्य...

५१ वी कोल्हापुर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ : पुणे ग्रामीणमध्ये भव्य उद्घाटन

✍️नितीन करडे

पुणे : ५१ वी कोल्हापुर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ यावर्षी आयोजित करण्याचा मान पुणे ग्रामीण पोलीस दलाला मिळाला आहे. दि. १७ ते २१ नोव्हेंबर दरम्यान पोलीस परेड ग्राऊंड, पोलीस उपमुख्यालय, बऱ्हाणपुर, (बारामती) येथे या भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. १७ नोव्हेंबर रोजी झालेल्या उद्घाटन समारंभास संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, विभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांच्या आगमनावेळी यमाई हलगी ग्रुप, अकलुज, सोलापूर यांनी हलगी नाद करून स्वागत केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी मान्यवरांना रोपटी देऊन सत्कार केला. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने मान्यवरांना मानवंदना दिली. पोलिस कॉन्स्टेबल शाहरूख शेख यांनी मशालीसह क्रिडांगणावर धाव घेतली. मुख्य अतिथी यांच्या हस्ते क्रिडाज्योती प्रज्वलन करण्यात आले. सर्व उपस्थित खेळाडूंनी शपथ घेऊन स्पर्धेची औपचारिक सुरुवात झाली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की, कोल्हापुर परिक्षेत्रातील खेळाडूंनी सलग ११ वर्षे राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी सर्व खेळाडूंना आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व सांगत सर्व खेळाडूंना नियमांचे पालन करून खऱ्या खिलाडूवृत्तीने खेळण्याचे मार्गदर्शन केले.

स्पर्धेत ७ सांघिक आणि १२ वैयक्तिक खेळप्रकारांचा समावेश आहे. पुणे ग्रामीण, कोल्हापुर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण व सोलापूर शहर या घटकांमधील ९०० पुरुष व २५० महिला पोलीस कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल बारामती, थोरात इंग्लिश मिडीयम स्कूल भिगवण आणि धोंडीबा आबाजी सातव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मैदानावर उपस्थित राहून सांघिक व वैयक्तिक खेळांचा थरार अनुभवला.

पहिल्या दिवसाचे निकाल

  • १०००० मी. पुरुष धावणे – हर्षवर्धन दबडे (सातारा)
  • ५००० मी. महिला धावणे – ऋतुजा कांबळे (पुणे ग्रामीण)
  • ८०० मी. पुरुष धावणे – ओंकार कुंभार (कोल्हापुर)
  • लांबउडी (महिला) – आरती फाळके (सातारा)
  • लांबउडी (पुरुष) – निहाल मोरे (सातारा)
  • ११० मी. हर्डल्स (पुरुष) – अमृत तिवळे (कोल्हापुर)
  • १०० मी. हर्डल्स (महिला) – वैष्णवी शिंदे (सातारा)
  • कार्यक्रमाचे आभार राजेंद्र मायने, पोलीस उपअधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी मानले. त्यांनी आयोजन समितीच्या उत्कृष्ट नियोजनाचे आणि सर्व खेळाडू व उपस्थितांचे हार्दिक आभार मानून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धक्कादायक! उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांच्या मोटारसायकल सीटवर ब्लेड हल्ला; 8 ते 10 वाहनांचे नुकसान

धक्कादायक! उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांच्या मोटारसायकल सीटवर ब्लेड हल्ला; 8 ते 10 वाहनांचे नुकसान उरुळी कांचन : उरुळी कांचन येथे शिक्षणासाठी क्लासला येणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करत...

सोरतापवाडी फाटा येथे भीषण अपघात; हायवा डंपरच्या टायरखाली तरुणाचा जागीच मृत्यू

सोरतापवाडी फाटा येथे भीषण अपघात; हायवा डंपरच्या टायरखाली तरुणाचा जागीच मृत्यू ✍️नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी फाटा येथे शुक्रवारी (ता. ३...

पुणे–सोलापूर महामार्गावर दगड-धोंड्यांचा धोका; अपघातास निमंत्रण, नागरिकांचा संताप

पुणे–सोलापूर महामार्गावर दगड-धोंड्यांचा धोका; अपघातास निमंत्रण, नागरिकांचा संताप ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सोरतापवाडी फाटा येथे गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार...

शिंदवणे घाटात पावसाचा कहर; रस्त्यावर खडी-दगडांचा सापळा, प्रशासन झोपेत?

शिंदवणे घाटात पावसाचा कहर; रस्त्यावर खडी-दगडांचा सापळा, प्रशासन झोपेत? ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : जेजुरी–बेल्हे महामार्गावरील शिंदवणे घाट (ता. हवेली) येथे बुधवारी (ता....

उरुळी कांचन येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

उरुळी कांचन येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात आणि...

error: Content is protected !!