शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे तरुणीवर होणारा अनुचित प्रकार टळला ; उरुळी कांचन येथील घटना
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन रेल्वे स्टेशन परिसरात तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन रेल्वे स्टेशन परिसरात शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे तरुणीवर होणारा अनुचित प्रकार टळला. मिळालेल्या माहितीनुसार सोमवार (ता. ४ जुलै) रोजी तांबे वस्ती येथील शेतकरी धनंजय (दादा) तांबे हे रेल्वे स्टेशन शेजारील आपल्या शेतात पाणी धरत होते. त्यांच्या शेती शेजारीच उसाची शेती आहे. एक वाजण्याच्या दरम्यान शेजारील उसाच्या शेतातून एक तरुणी आरडा ओरडा करत बाहेर पळत आली. त्यावेळी दादा तांबे यांनी तीला विचारले कि काय झाले. त्यावेळी तीने सांगितले तो माझे तोंड दाबत होता. व अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याच्या हाताला चावा घेऊन पळाले आहे. हे बोलत असताना अतिप्रसंग करणारा व्यक्तीने उसाच्या बाहेर येऊन पाहिले असता तिच्या शेजारीच शेतकरी दिसल्याने तो पुन्हा उसात पळून गेला. व शेतकरी दादा तांबे यांनी तरुणीला धीर देत पिण्यासाठी पाणी देऊन पोलीस स्टेशनला नेले. आणि पो हवालदार कमलेश होले यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यावेळी पो हवालदार कमलेश होले यांनी सदर तरुणीच्या घरच्यांशी संपर्क करून तरुणीला सुखरूप नातलगांच्या स्वाधीन केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की तरुणी बिहार वरून पुण्याला निघाली होती. तरुणीला संकटातून वाचवणाऱ्या शेतकऱ्याचे परिसरातून कौतुक.























