Homeक्राईमउरुळी कांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ! मेडिकलचे शटर उचकटून रोख रक्कम लंपास; पाच दिवसात...

उरुळी कांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ! मेडिकलचे शटर उचकटून रोख रक्कम लंपास; पाच दिवसात शटर उचकटण्याची दुसरी घटना

सीसीटीव्हीत तीन चोरटे कैद; पुणे–सोलापूर महामार्गावरील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण, पोलिसांसमोर चोरांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान
✍️नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) येथे चोरट्यांनी पुन्हा एकदा धाडसी चोरी करून पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रविवार (ता. २६ जुलै) रोजी पुणे–सोलापूर महामार्गावरील माऊली हॉस्पिटल परिसरातील मल्हार मेडिकल या दुकानाचे शटर मध्यरात्री उचकटून अज्ञात तीन चोरट्यांनी सुमारे २५ ते २७ हजारांच्या सुमारास रोख रक्कम लंपास केली असल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, संपूर्ण चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामध्ये तीन चोरटे स्पष्टपणे दिसत आहेत. शटर उचकटून काही मिनिटांतच चोरट्यांनी गल्ल्यातील रोकड घेऊन पलायन केल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे.

या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त होत आहे. कारण अवघ्या पाच दिवसांपूर्वी उरुळी कांचनमधील पुणे–सोलापूर महामार्गावरील एका दूध डेरीचे शटर उचकटून रोख रक्कम व काही साहित्य चोरीला गेले होते. त्या घटनेचा तपास पूर्ण होण्याआधीच पुन्हा त्याच पद्धतीने मेडिकलला लक्ष्य करण्यात आल्याने परिसरात एकच चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पुणे–सोलापूर महामार्गालगत असलेल्या व्यावसायिक आस्थापनांना सातत्याने लक्ष्य केले जात असल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी गस्त वाढविणे, संशयितांची तातडीने ओळख पटविणे आणि सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना अटक करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.

या सलग दोन घटनांमुळे उरुळी कांचन परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना कितपत यश येते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. व्यापाऱ्यांनी पोलिस प्रशासनाकडे रात्रीची गस्त वाढवून अशा घटनांवर तातडीने आळा घालण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचन वाहतूक कोंडीने महामार्ग ठप्प!, पंचर बसमुळे तीन-चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; दोन ते तीन...

उरुळी कांचन वाहतूक कोंडीने महामार्ग ठप्प!  पंचर बसमुळे तीन-चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; दोन ते तीन तास नागरिकांचा संताप   ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील...

उरळगाव–न्हावरा परिसरातील वीजप्रश्नांना दिलासा; ५ एम.व्ही.ए. पॉवर रोहित्र व ११ केव्ही लिंक लाईनचे लोकार्पण

उरळगाव–न्हावरा परिसरातील वीजप्रश्नांना दिलासा; ५ एम.व्ही.ए. पॉवर रोहित्र व ११ केव्ही लिंक लाईनचे लोकार्पण ✍️ नितीन करडे पुणे : शिरूर-हवेली मतदारसंघातील उरळगाव, न्हावरा, आलेगावपागा व परिसरातील...

जुन्नरमध्ये ३ किलो गांजा जप्त; इनोव्हा कार, स्कूटरसह १०.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जुन्नरमध्ये ३ किलो गांजा जप्त; इनोव्हा कार, स्कूटरसह १०.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीतील अहिल्यादेवी होळकर शाळा क्र....

उरुळी कांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ! महामार्गालगतची दूध डेअरी फोडून सुमारे ६० हजारांची रोकड लंपास; तीन...

उरुळी कांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ! महामार्गालगतची दूध डेअरी फोडून सुमारे ६० हजारांची रोकड लंपास; तीन चोर सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन...

पिंपळे जगताप पाझर तलावातील अज्ञात मृतदेह खून प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा; तिघांना अटक

पिंपळे जगताप पाझर तलावातील अज्ञात मृतदेह खून प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा; तिघांना अटक ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाझर...

error: Content is protected !!