Homeक्राईमपिंपळे जगताप पाझर तलावातील अज्ञात मृतदेह खून प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा;...

पिंपळे जगताप पाझर तलावातील अज्ञात मृतदेह खून प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा; तिघांना अटक

पिंपळे जगताप पाझर तलावातील अज्ञात मृतदेह खून प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा; तिघांना अटक

✍️ नितीन करडे

पुणे प्रतिनिधी : शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात युवकाच्या खून प्रकरणाचा शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत उलगडा करत तीन आरोपींना अटक केली आहे. तांत्रिक विश्लेषण, सोशल मीडियाच्या मदतीने ओळख पटविणे आणि सखोल तपासाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.

दि. १७ जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील पाझर तलावात अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला होता. गळ्यावर धारदार हत्याराने वार करून खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तलावात फेकल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस पाटील वर्षा योगेश थिटे यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ६३३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), २३८ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

मृतदेह अनेक दिवस पाण्यात असल्याने तो पूर्णपणे सडलेला, फुगलेला होता. तसेच पाण्यातील प्राण्यांमुळे चेहऱ्याचे अवयव विद्रूप झाल्याने ओळख पटविणे अत्यंत कठीण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी मृताचे छायाचित्र, कपडे व इतर वस्तूंची माहिती सोशल मीडियावर आणि जाहीरातींच्या माध्यमातून प्रसारित केली. त्याचबरोबर स्वतंत्र तपास पथके तयार करून मृताची ओळख आणि आरोपींचा शोध सुरू करण्यात आला.

दि. १९ जुलै रोजी एल अँड टी फाटा परिसरात वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस शिपाई लखन शिरसकर यांच्या निदर्शनास काही संशयास्पद हालचाली आल्या. चौकशीअंती संबंधित व्यक्ती बिहारमधील त्यांचा नातेवाईक टुटुकुमार अजीत यादव (वय २२) हा १५ जुलैपासून बेपत्ता असल्याचे सांगत होते. त्यांना तातडीने शिक्रापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे मृतदेहावरील कपड्यांचे वर्णन व इतर माहिती दाखविल्यानंतर मृताची ओळख टुटुकुमार अजीत यादव (रा. देवचंद बिघा, थाना काको, जि. जेहानाबाद, बिहार) अशी निश्चित झाली. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, साक्षीदारांचे जबाब आणि अन्य पुराव्यांच्या आधारे तीन आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पुसकरकुमार अरुण यादव (वय २०), आयुषमान सुशिल पांडे (वय २०) आणि सचिन मारुती हिंगेवार (वय २०) यांचा समावेश आहे.

मुख्य आरोपी पुसकरकुमार यादव याने चौकशीत दिलेल्या माहितीनुसार, मृत टुटुकुमार यादव याच्यावर आरोपीच्या गावातील शेतातील वीजपंप चोरीचा संशय होता. तसेच आरोपीच्या बहिणीच्या प्रेमसंबंधांना तो मदत करत असल्याचा आणि सोशल मीडियावर संबंधित फोटो व स्टोरी टाकत असल्याचा आरोपीला राग होता. या वैमनस्यातून इतर आरोपींसोबत संगनमत करून त्याने टुटुकुमारचा खून केल्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या तपासात शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, सोमनाथ कचरे तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक, आपदा मित्र टीम आणि रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण तपास पथकाचे अभिनंदन केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनच्या हेमलता बडेकर यांची राज्यस्तरीय महिला आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती!

उरुळी कांचनच्या हेमलता बडेकर यांची राज्यस्तरीय महिला आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती उरुळी कांचन : अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक महासंघाच्या राज्यस्तरीय महिला आघाडीच्या...

सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उरुळी कांचन : (८ सप्टेंबर) उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य...

उरुळी कांचन येथे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी!

उरुळी कांचन येथे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी: उरुळी कांचन (ता. हवेली) येथे स्वातंत्र्यसंग्रामातील धाडसी क्रांतिकारक आणि आद्य स्वातंत्र्यवीर...

अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी; १ लाख ११ हजार १११ रुपयांचे...

अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी; १ लाख ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक पटकावले ✍️ नितीन...

आरोग्याचा जागर अन् सामाजिक उपक्रमांचे आयोजन; सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त उरुळी कांचनमध्ये मोफत...

आरोग्याचा जागर अन् सामाजिक उपक्रमांचे आयोजन; सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त उरुळी कांचनमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर! उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली)...

error: Content is protected !!