Homeताज्या बातम्याबाल उद्योजकांच्या कल्पनांचा रंगतदार मेळा; ‘बिझ किड्स’ उपक्रमाची जोरदार दाद

बाल उद्योजकांच्या कल्पनांचा रंगतदार मेळा; ‘बिझ किड्स’ उपक्रमाची जोरदार दाद

✍️नितीन करडे 

उरुळी कांचन | प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील इंग्रजी माध्यम उन्नती कन्या विद्यालयात बाल उद्योजकांच्या कल्पनांचा रंगतदार ‘बिझ-किड्स मार्केट’ हा मेळावा उत्साहात पार पडला. विविध सर्जनशील उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या आणि पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या फक्त मुलींच्या उन्नती कन्या विद्यालय (CBSE – Affiliation No. 1131458) यांनी हा उपक्रम आयोजित केला होता.

या मेळाव्यात नर्सरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवत हस्तकला वस्तू, पेंटिंग्ज, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, मजेशीर खेळ आणि आठवडी बाजार अशा आकर्षक स्टॉल्सची मांडणी केली होती.

प्रत्येक विद्यार्थिनीने स्वतः ग्राहकांशी संवाद साधत वस्तूंची विक्री केली, आर्थिक व्यवहार हाताळले आणि बाल उद्योजकता, आत्मविश्वास तसेच व्यावहारिक ज्ञान यांचा उत्तम संगम सादर केला. मुलींची कल्पकता, मेहनत आणि व्यवहारकुशलता पाहून पालक व नागरिकांनी त्यांचे मनापासून कौतुक केले.

या कार्यक्रमाला पालक, स्थानिक व्यावसायिक, पञकार तसेच पंचक्रोशीतील प्रतिष्ठित पाहुण्यांनी भेट देत खरेदीचा मनमुराद आनंद लुटला. शैक्षणिक संस्थेचे आधारस्तंभ सुरेश कांचन, संचालिका नयॉन सुरेश कांचन आणि प्राचार्या डॉ. नुपूर कांचन यांनी देखील विद्यार्थिनींकडून खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दिले.

मेळाव्यातील उत्स्फूर्त सहभाग, मुलींची ऊर्जा आणि निर्मितीशक्ती पाहता “हा उपक्रम पुढील वर्षीही अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करावा,” अशी अपेक्षा उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा...

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा ६७ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकावर गुन्हा दाखल ✍️ नितीन...

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले..”आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन”

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले.."आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन" वाडेबोल्हाई/पुणे:विजय लोखंडे कोपर्डी(ता.कर्जत) येथे आदर्श शिक्षक किसन काळूराम चव्हाण (वय ५६) यांचे गुरुवार,दि.६...

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास! पांगारे वस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार कोयता घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी...

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल!

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर 'मोक्का' अंतर्गत गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे पुणे : कोंढवा परिसरात अवैध गांजा विक्री करून दहशत निर्माण करणाऱ्या...

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हिंजवडी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत घडलेल्या खूनप्रकरणातील आरोपीला...

error: Content is protected !!