Homeसामाजिकपेरणेत दीड महिन्यांपासून बंद असलेले वीज रोहीत्र (डिपी) ४८ तासात बसवले!

पेरणेत दीड महिन्यांपासून बंद असलेले वीज रोहीत्र (डिपी) ४८ तासात बसवले!

पेरणेत दीड महिन्यांपासून बंद असलेले वीज रोहीत्र(डिपी) ४८ तासात बसवले.
प्रदिप वसंत कंद यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी

लोणीकंद प्रतिनिधी : पेरणे (ता.हवेली) येथे विजय रणस्तंभ जवळील शेतीत दीड महिन्यांपासून बंद असलेले रोहित्र (डिपी) ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वरिष्ठ सरचिटणीस तथा वीज वितरण नियत्रंण समितीचे जिल्हा सदस्य प्रदिप वसंत कंद यांच्या तात्काळ पाठपुराव्यामुळे वीज वितरण खात्याने दखल घेऊन अवघ्या ४८ तासांत बसवले.त्यामुळे शेतकऱ्यांचा वीजेचा मोठा प्रश्न मार्गी लागल्याने पेरणे गावातील शेतकऱ्यांनी कंद यांचे आभार व्यक्त केले.अशी माहिती सुरेश वाळके यांनी दिली.

भीमा नदीच्या किनारी भागात वसलेला पेरणे पंचकृषी परिसर हा शेतीप्रधान आहे.हिरवाई शेतीने नटलेला हा परिसर ओळखला जातो.मात्र पेरणे फाटा जवळ असलेल्या विजय रणस्तंभ शेजारील शेतीत असलेले रोहित्र(डीपी) हे गेले दीड महिन्यांपासून बंद होते त्यामुळे येथील स्थानिक शेतकऱ्यांसमोर वीजेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.वीजे अभावी शेतकऱ्यांची शेतातील कामे रखडली होती.त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते.

हा वीजेचा प्रश्न,समस्या स्थानिक शेतकरी सुरेश वाळके व इतरत्र शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश वरिष्ठ सरचिटणीस प्रदिप वसंत कंद यांना कळविल्यानंतर कंद यांनी तात्काळ सबंधित वीज खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हे रोहित्र(डीपी) बसविण्याच्या सूचना देऊन पाठपुरावा केला त्यामुळे दीड महिन्यांपासून बंद असलेले रोहित्र(डीपी) ही येथे अवघ्या ४८ तासात सबंधित वीज खात्याने बसविले.याप्रसंगी वायरमन पाटील,शेतकरी सूरेश लहानू वाळके,शरद काळूराम वाळके,खंडू बाबूराव गावडे,खरेदी विक्री संघाचे संचालक दादासाहेब माने,कैलास बबन वाळके,आप्पासाहेब शेडकर,अदिनाथ रोहिदास वाळके,आदी शेतकरी उपस्थित होते.

विजय रणस्तंभ जवळील शेतात अवघ्या ४८ तासात (डीपी) बसवताना वीज खात्याचे कर्मचारी,वायरमन,सह शेतकरी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक!

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक ✍️ नितीन करडे पुणे : आजी-माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देणे आणि त्यांच्या विविध अडचणी जाणून...

पुणे-सोलापूर महामार्गावर पाठलाग करून एनडीपीएस गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक; अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे...

पुणे-सोलापूर महामार्गावर पाठलाग करून एनडीपीएस गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक; अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे शाखेची कारवाई ✍️ नितीन करडे पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे...

शिरूरमध्ये सलग दुसरी एनडीपीएस कारवाई; २० ग्रॅम एमडीसह स्कॉर्पिओ जप्त, दोघे ताब्यात!

शिरूरमध्ये सलग दुसरी एनडीपीएस कारवाई; २० ग्रॅम एमडीसह स्कॉर्पिओ जप्त, दोघे ताब्यात ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : शिरूर परिसरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे...

कचऱ्याचे साम्राज्य हटले; ‘पुणे बुलेटिन न्यूज’च्या बातमीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून दखल!

कचऱ्याचे साम्राज्य हटले; ‘पुणे बुलेटिन न्यूज’च्या बातमीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून दखल ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) गावाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर मोठ्या प्रमाणात...

विवेक कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड; एम.पी.एस.सी.परीक्षेत यश..

विवेक कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड; एम.पी.एस.सी.परीक्षेत यश.. -- ✍️ विजय लोखंडे  वाघोली प्रतिनिधी : लोणीकंद गावचे सुपुत्र विवेक दत्तात्रय कंद यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)...

error: Content is protected !!