Homeसामाजिकपुणे–सोलापूर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; कवडीपाट ते फुरसुंगी फाटा एक किलोमीटरसाठी दीड...

पुणे–सोलापूर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; कवडीपाट ते फुरसुंगी फाटा एक किलोमीटरसाठी दीड तास, वाहनचालक संतप्त!

पुणे–सोलापूर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; कवडीपाट ते फुरसुंगी फाटा एक किलोमीटरसाठी दीड तास, वाहनचालक संतप्त
✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी | पुणे–सोलापूर महामार्गावरील फुरसुंगी फाटा येथे शनिवारी (ता. १८ जुलै ) दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या दरम्यान भीषण वाहतूक कोंडी झाल्याने हजारो वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. कवडीपाट ते फुरसुंगी फाटा हे अवघे सुमारे एक किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल एक ते दीड तास लागत असल्याने वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

वाहतुकीची परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की अनेक वाहनचालकांनी वेळ वाचवण्यासाठी पुण्याच्या दिशेने विरुद्ध दिशेनेच वाहने चालवण्यास सुरुवात केली. त्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढला असून महामार्गावर काही काळ अत्यंत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

वाहतूक कोंडीत अडकलेले विपुल घोडके यांनी सांगितले की, “कवडीपाट टोलपासून फुरसुंगी फाट्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक ते दीड तास लागला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नागरिकांचा वेळ, इंधन आणि संयम तिन्ही गोष्टींचा मोठा भुर्दंड बसला.”

दरम्यान, वाहतूक कोंडीची माहिती मिळताच हडपसर वाहतूक विभागाने तातडीने घटनास्थळी वाहतूक पोलिसांना रवाना केले. “वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळी पाठवण्यात आले असून, लवकरात लवकर वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,” अशी माहिती हडपसर वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी करणकोट यांनी दिली.

शनिवार असल्याने तसेच पुणे–सोलापूर महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण आला. मात्र अशा महत्त्वाच्या मार्गावर वारंवार निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रशासनाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

वाहनचालकांनी महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेत कायमस्वरूपी सुधारणा करण्याची, महत्त्वाच्या चौकांवर अतिरिक्त वाहतूक पोलीस तैनात करण्याची आणि भविष्यात अशा कोंडीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनच्या हेमलता बडेकर यांची राज्यस्तरीय महिला आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती!

उरुळी कांचनच्या हेमलता बडेकर यांची राज्यस्तरीय महिला आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती उरुळी कांचन : अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक महासंघाच्या राज्यस्तरीय महिला आघाडीच्या...

सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उरुळी कांचन : (८ सप्टेंबर) उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य...

उरुळी कांचन येथे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी!

उरुळी कांचन येथे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी: उरुळी कांचन (ता. हवेली) येथे स्वातंत्र्यसंग्रामातील धाडसी क्रांतिकारक आणि आद्य स्वातंत्र्यवीर...

अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी; १ लाख ११ हजार १११ रुपयांचे...

अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी; १ लाख ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक पटकावले ✍️ नितीन...

आरोग्याचा जागर अन् सामाजिक उपक्रमांचे आयोजन; सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त उरुळी कांचनमध्ये मोफत...

आरोग्याचा जागर अन् सामाजिक उपक्रमांचे आयोजन; सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त उरुळी कांचनमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर! उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली)...

error: Content is protected !!