Homeक्राईमउरुळी कांचनजवळ सिग्नलच्या वायरी कापून होस्पेट एक्स्प्रेस थांबवली; घटनास्थळी त्वरित पोलीस दाखल...

उरुळी कांचनजवळ सिग्नलच्या वायरी कापून होस्पेट एक्स्प्रेस थांबवली; घटनास्थळी त्वरित पोलीस दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला!

उरुळी कांचनजवळ सिग्नलच्या वायरी कापून होस्पेट एक्स्प्रेस थांबवली; घटनास्थळी त्वरित पोलीस दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला
✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : दौंड-पुणे रेल्वे मार्गावरील उरुळी कांचन रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी (ता.१७ जुलै ) रोजी मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे रेल्वे प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली. गाडी क्रमांक १११४० होस्पेट–मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस ही रात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या दरम्यान रेल्वे पोल क्रमांक २२१/१९ शेजारील URI/ S-20 सिग्नलच्या वायरी अज्ञात व्यक्तींनी कापल्याने हवेली व दौंड तालुक्याच्या सीमेवरील निर्जन ठिकाणी एक्सप्रेस गाडी थांबली.

प्राथमिक माहितीनुसार, रेल्वे थांबल्यानंतर शेवटीच्या जनरल डब्यालगत असलेल्या स्लीपर कोचमधील एका महिला प्रवाशाचा मोबाईल खिडकीतून हात घालून हिसकावून नेण्यात आला. मोबाईल चोरीची घटना घडताच प्रवाशांनी आरडाओरडा केल्याने व रेल्वे पोलीस आणि उरुळी कांचन पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. माहिती मिळताच रेल्वे पोलीस हवालदार के. बी. देशमुख, पोलीस आरक्षक रफिक शेख तसेच उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस मनोज रत्नपारखी, अमोल राऊत आणि कमलेश होले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी करून संशयितांचा शोध सुरू केला. मात्र अंधाराचा फायदा घेत संशयित पसार झाल्याचे समजते.

प्राथमिक माहितीनुसार, घटनास्थळी तीन ते चार जणांची टोळी कार्यरत असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच मोबाईल चोरीव्यतिरिक्त अन्य काही चोरीच्या घटना घडल्या आहेत का, याचाही तपास सुरू आहे.
घटनेनंतर रेल्वे सुमारे अर्धा ते एक तास घटनास्थळी थांबली होती. वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकारी, डीवायएसपी, वरिष्ठ अधिकारी तसेच रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि सिग्नल यंत्रणेची तपासणी केली.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वीही याच परिसरात सिग्नलमध्ये छेडछाड करून रेल्वे थांबविण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा होती. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेऊन रेल्वे मार्गावरील सुरक्षा वाढविण्याची मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 – रेल्वे पोलीस अधिकारी पाहणी करत असताना 

या प्रकरणी रेल्वे पोलीस अधिक तपास करत असून, सिग्नलच्या वायरी कापणारे आणि मोबाईल चोरी करणाऱ्या संशयितांचा शोध सुरू आहे. अधिकृत तपासानंतरच घटनेमागील नेमके कारण आणि संबंधित आरोपींबाबत स्पष्ट माहिती समोर येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वारीदरम्यान अपघातग्रस्त वारकरी भगिनीला तात्काळ आर्थिक व वैद्यकीय मदत द्यावी – आमदार ज्ञानेश्वर (माऊली-आबा)...

वारीदरम्यान अपघातग्रस्त वारकरी भगिनीला तात्काळ आर्थिक व वैद्यकीय मदत द्यावी – आमदार ज्ञानेश्वर (माऊली-आबा) कटके यांची उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे मागणी ✍️ नितीन करडे पुणे :...

पुणे–सोलापूर महामार्गावर अपघात; हायवा ट्रकच्या समोरील टायरला बुलेटची जोरदार धडक; युवक जखमी, चालक पसार

पुणे–सोलापूर महामार्गावर अपघात; हायवा ट्रकच्या समोरील टायरला बुलेटची जोरदार धडक; युवक जखमी, चालक पसार सलग दोन दिवसांत दोन अपघात; महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत नागरिकांमध्ये चिंता! उरुळी कांचन...

पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी येथे भरधाव कारच्या धडकेत मजूर गंभीर जखमी ; उरुळी कांचन पोलिसांत...

पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी येथे भरधाव कारच्या धडकेत मजूर गंभीर जखमी ; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी...

ओतूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दरोड्याच्या तयारीतील आंतरराज्यीय टोळी जेरबंद, २०...

ओतूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दरोड्याच्या तयारीतील आंतरराज्यीय टोळी जेरबंद, २० गुन्हे उघड; पुणे ग्रामीण पोलिसांचे सर्वत्र कौतुक! ✍️ नितीन करडे पुणे :...

पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांच्या बॅटरी चोरांचा धुमाकूळ; उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या जवळच चोरी ; ट्रक,...

पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांच्या बॅटरी चोरांचा धुमाकूळ; उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या जवळच चोरी ; ट्रक, हायवाच्या बॅटऱ्या होत आहेत लक्ष्य ✍️ नितीन करडे पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांच्या बॅटरी...

error: Content is protected !!