Homeसामाजिकपुणे–सोलापूर महामार्गावर दगड-धोंड्यांचा धोका; अपघातास निमंत्रण, नागरिकांचा संताप

पुणे–सोलापूर महामार्गावर दगड-धोंड्यांचा धोका; अपघातास निमंत्रण, नागरिकांचा संताप

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सोरतापवाडी फाटा येथे गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एक ट्रक रस्त्याच्या खाली उतरल्याने संबंधित ठिकाणी महामार्गावरच मोठ्या प्रमाणात मोठे दगड ठेवण्यात आले आहेत. दगड महामार्गावरच ठेवल्याने वाहनचालकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

महामार्ग हा नेहमीच वर्दळीचा असून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात अवजड व हलकी वाहने या मार्गाने प्रवास करतात. अशा परिस्थितीत रस्त्याच्या मध्यभागी किंवा कडेला विनासूचना ठेवलेले दगड हे अपघातास थेट निमंत्रण ठरत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा वेगात येणाऱ्या वाहनांना हे दगड दिसणे कठीण जात असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “तात्पुरत्या उपाययोजनांच्या नावाखाली महामार्गावर अडथळे निर्माण करणे धोकादायक आहे. अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. तसेच संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन हे दगड हटवावेत आणि सुरक्षिततेची योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे. महामार्गावर अडथळा निर्माण करणारे दगड न हटवल्यास रात्रीत एखादा अपघात घडण्याचे नाकारता येत नाही.

दरम्यान, अशा प्रकारांमुळे आधीच अपघातप्रवण असलेल्या पुणे–सोलापूर महामार्गावरील धोका आणखी वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी त्वरित कारवाई करून संभाव्य दुर्घटना टाळाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

error: Content is protected !!