Homeसामाजिकनव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात; सागर शेलार यांची जिल्हा परिषद शाळांना भेट

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात; सागर शेलार यांची जिल्हा परिषद शाळांना भेट

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात; सागर शेलार यांची जिल्हा परिषद शाळांना भेट
✍️ नितीन करडे

पुणे : नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी राहु-खामगाव जिल्हा परिषद गटातील प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. या निमित्ताने जिल्हा परिषद सदस्य तथा शिक्षण व क्रीडा समिती सदस्य सागर रघुनाथ शेलार यांनी गटातील विविध शाळांना भेटी देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून शिक्षणाचा दर्जा व शाळांच्या भौतिक सुविधांबाबत आढावा घेतला.

“राहु-खामगाव गटातील विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ‘ॲक्शन प्लॅन’वर चर्चा”

यावेळी जि.प. प्राथमिक शाळा मिरवडी, शेलारमेमाणवाडी, उत्तमनगर, डुबेवाडी आणि टाकळी भीमा येथील शाळांना भेट देण्यात आली. दीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर शाळेत परतलेल्या चिमुकल्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, आकर्षक सजावट आणि आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि शाळांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसोबत विशेष बैठक घेण्यात आली. यामध्ये शाळांच्या भौतिक सुविधांचा विकास, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, इमारतींची दुरुस्ती, डिजिटल वर्गखोल्या, सुसज्ज क्रीडांगणे तसेच विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबाबत चर्चा झाली.

नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत आणि शाळांच्या विकासासाठी आखण्यात आलेल्या कृती आराखड्यामुळे पालक व ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालकांचा सहभाग वाढविणे आणि शाळा व्यवस्थापन समितीमार्फत शाळांना आवश्यक सहकार्य मिळवून देण्यावरही भर देण्यात आला.

 “ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा या केवळ शिक्षणाचे केंद्र नसून गावाच्या संस्कृतीचे आणि भावी पिढी घडविण्याचे केंद्र आहेत. राहु-खामगाव गटातील एकही विद्यार्थी दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लोकसहभाग आणि शासकीय निधीच्या माध्यमातून सर्व शाळांचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला जाईल.”

–सागर रघुनाथ शेलार, सदस्य, जिल्हा परिषद 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये सायलेन्सर काढून दहशत! कर्कश आवाजात भरधाव फेऱ्या; नागरिक त्रस्त

उरुळी कांचनमध्ये सायलेन्सर काढून दहशत! कर्कश आवाजात भरधाव फेऱ्या; नागरिक त्रस्त उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात सायलेन्सर काढलेल्या मोटरसायकलींचा त्रास दिवसेंदिवस...

आठवडे बाजारात हरवलेली चिमुकली अवघ्या अर्ध्या तासात आई-वडिलांच्या स्वाधीन; उरुळी कांचन पोलिसांची तत्परता

आठवडे बाजारात हरवलेली चिमुकली अवघ्या अर्ध्या तासात आई-वडिलांच्या स्वाधीन; उरुळी कांचन पोलिसांची तत्परता ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील रविवारी...

रामवाडी-वाघोली मेट्रो मार्गाबाबत आढावा बैठक; नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्याच्या आमदार कटके यांच्या सूचना

रामवाडी-वाघोली मेट्रो मार्गाबाबत आढावा बैठक; नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्याच्या आमदार कटके यांच्या सूचना ✍️ नितीन करडे पुणे : प्रस्तावित रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गासंदर्भात मेट्रो प्रशासनाच्या...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात ७०० वृक्षांचे रोपण; विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात ७०० वृक्षांचे रोपण; विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून युथ...

उरुळी कांचनमध्ये दारूबंदी केवळ कागदावर? बेकायदा दारू विक्री जोमात

उरुळी कांचनमध्ये दारूबंदी केवळ कागदावर? बेकायदा दारू विक्री जोमात नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी ✍️नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड व हडपसर परिसरात विषारी हातभट्टी दारूमुळे...

error: Content is protected !!