Homeक्राईमखुनाच्या गुन्ह्यातील आरोपी ६ तासांत जेरबंद; चंदननगर पोलिसांची तात्काळ कारवाई

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी ६ तासांत जेरबंद; चंदननगर पोलिसांची तात्काळ कारवाई

✍️ नितीन करडे

पुणे : चंदननगर परिसरात घडलेल्या खुनाच्या गंभीर घटनेत पोलिसांनी अवघ्या ६ तासांत आरोपींना अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा येथील गणेशनगर परिसरात राहणाऱ्या पुनम दिनेश मुन (वय ३९) यांचा खून करण्यात आला. पुनम मुन यांचे अॅड. संजय सावंत यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांना होता. या संशयातूनच अॅड. संजय सावंत यांची पत्नी स्वाती सावंत, त्यांची मुलगी तसेच स्वतः अॅड. संजय सावंत यांनी संगनमत करून हा कट रचल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

(ता. १६ एप्रिल) रोजी दुपारी २ ते (१७ एप्रिल) रोजी सकाळी ११ या कालावधीत चंदननगर येथील जुना मुंढवा रोडवरील अॅड. सावंत यांच्या कार्यालयात ही घटना घडली. आरोपींनी पुनम मुन हिला दोरीने बांधून तिच्यावर बॅट तसेच धारदार शस्त्राने वार करत निर्घृण खून केला.

या प्रकरणी चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ तांत्रिक तपास सुरू केला. त्याअंतर्गत अॅड. संजय सावंत आणि त्यांच्या मुलीला ताब्यात घेण्यात आले. तसेच स्वाती सावंत हिला गुन्हे शाखेच्या खंडणी विभाग-२ पथकाने अटक केली. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त नुतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त नुतन पवार तसेच गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख, तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या पूर्ण केली.

या जलद कारवाईमुळे पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचन वाहतूक कोंडीने महामार्ग ठप्प!, पंचर बसमुळे तीन-चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; दोन ते तीन...

उरुळी कांचन वाहतूक कोंडीने महामार्ग ठप्प!  पंचर बसमुळे तीन-चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; दोन ते तीन तास नागरिकांचा संताप   ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील...

उरळगाव–न्हावरा परिसरातील वीजप्रश्नांना दिलासा; ५ एम.व्ही.ए. पॉवर रोहित्र व ११ केव्ही लिंक लाईनचे लोकार्पण

उरळगाव–न्हावरा परिसरातील वीजप्रश्नांना दिलासा; ५ एम.व्ही.ए. पॉवर रोहित्र व ११ केव्ही लिंक लाईनचे लोकार्पण ✍️ नितीन करडे पुणे : शिरूर-हवेली मतदारसंघातील उरळगाव, न्हावरा, आलेगावपागा व परिसरातील...

जुन्नरमध्ये ३ किलो गांजा जप्त; इनोव्हा कार, स्कूटरसह १०.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जुन्नरमध्ये ३ किलो गांजा जप्त; इनोव्हा कार, स्कूटरसह १०.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीतील अहिल्यादेवी होळकर शाळा क्र....

उरुळी कांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ! महामार्गालगतची दूध डेअरी फोडून सुमारे ६० हजारांची रोकड लंपास; तीन...

उरुळी कांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ! महामार्गालगतची दूध डेअरी फोडून सुमारे ६० हजारांची रोकड लंपास; तीन चोर सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन...

पिंपळे जगताप पाझर तलावातील अज्ञात मृतदेह खून प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा; तिघांना अटक

पिंपळे जगताप पाझर तलावातील अज्ञात मृतदेह खून प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा; तिघांना अटक ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाझर...

error: Content is protected !!