उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथे कस्तुरबा मातृ मंडळाच्या वतीने सायरस पूनावाला इंग्लिश मीडियम स्कूल येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरूवात ज्योत से ज्योत जगाते चलो या प्रेरणादायक गाण्याने दीप प्रज्वलन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभात कस्तुरबा मातृ मंडळाच्या सदस्यांनी एक रंगारंग नृत्य सादर केले. मनीषा गोखले शहा व लीना जोशी यांना शाल आणि पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. कस्तुरबा मातृ मंडळाच्या अध्यक्षा सुरेखा भन्साळी यांनी प्रास्ताविक केले आणि मंडळाच्या महिलांसाठी तसेच मुलांसाठी राबवलेले विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मनीषा गोखले यांनी महिलांना उद्देशून आपले विचार मांडले. त्यांनी सांगितले की, कुठल्याही वयात कला शिकता येते, स्वतः आनंदी आणि उत्साही राहणे, तसेच समाजाशी मिसळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांनी प्रथम स्वतःवर प्रेम करायला शिकले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या मीना जोशी यांनी असंभव स्वप्ने पाहण्याची कला व मजा या विषयावर महिलांशी संवाद साधला. त्यांनी साध्या आणि सोप्या भाषेत महिलांना दैनंदिन जीवनात स्वप्नं कशी पहावी आणि ती कशी साकार करावीत याचे मार्गदर्शन केले.
- या वर्षी, कस्तुरबा मातृ मंडळाने आदर्श युवती पुरस्कार नयन सुरेश कांचन आणि डॉ. नुपूर सुरेश कांचन यांना प्रदान केला. तसेच यावर्षी, “मी कोण” या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत प्रथम पारितोषिक विद्या रोहित मेटे, द्वितीय पारितोषिक सोनाली सुनील टिळेकर, तृतीय पारितोषिक प्रतिष्ठा मांडके आणि उत्तेजनार्थ पारितोषिक संपदा नितीन कांचन आणि लीला मोहन खराडे यांना प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमात उरुळी कांचन पतसंस्थेचे अध्यक्ष देविदास भन्साळी, अशोक सावंत, जे.बी. सराफ, शिवाजी कांचन, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष के.डी. कांचन, महादेव कांचन, संभाजी कांचन, सुरेश कांचन , सुशीला मेटे, जयश्री बेद्रे, संगीता भालके,आशा कांचन, राजश्री शितोळे, प्रिया बलदोटा, उज्वला लोखंडे, पुष्पाताई पदवाड, अनिता चौधरी, रूपाली चौधरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनल फुलपगर आणि अंजली कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्वाती चौधरी यांनी केले.























