Homeक्राईमउरुळी कांचनमध्ये भीषण अपघात; रुग्णवाहिकेची मोटरसायकलला धडक, दोन गंभीर, एक किरकोळ जखमी

उरुळी कांचनमध्ये भीषण अपघात; रुग्णवाहिकेची मोटरसायकलला धडक, दोन गंभीर, एक किरकोळ जखमी

✍️ नितीन करडे | 

पुणे–सोलापूर महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. उरुळी कांचन येथे शनिवार (ता. २५ एप्रिल) रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान गंभीर अपघाताची घटना घडली असून, मोटरसायकलला रुग्णवाहिकेची धडक बसल्याने दोन जण गंभीर जखमी झाले असून एक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उरुळी कांचन परिसरात भरधाव वेगात येणाऱ्या रुग्णवाहिकेने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत मोटरसायकलवरील तिघे जण गंभीर जखमी झाले. अपघात इतका तीव्र होता की, जखमी काही अंतरावर फेकले गेले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रसंगावधान दाखवत कस्तुरी रुग्णवाहिकेचे चालक माऊली लाड तसेच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य हाती घेतले. जखमींना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

” पाच दिवसापूर्वी शिंदवणे रोड येथे एका मोटरसायकल चालकाचा अपघात झाला होता त्या अपघातात एकाचे दोन्ही पाय निकामी झाले. तर दोन दिवसांपूर्वीच उरुळी कांचन येथील शिंदवणे चौकात 70 वर्षीय वृद्धाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या टेम्पो ने धडक दिली होती त्यात उपचार दरम्यान वृद्धाचा मृत्यू झाला होता. ” 

दरम्यान, पुणे–सोलापूर महामार्गावर सतत घडणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वेगमर्यादा, वाहतुकीचे नियम आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याने हा महामार्ग ‘मृत्यूचा सापळा’ ठरत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाने या महामार्गावरील वाढत्या अपघातांकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचन वाहतूक कोंडीने महामार्ग ठप्प!, पंचर बसमुळे तीन-चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; दोन ते तीन...

उरुळी कांचन वाहतूक कोंडीने महामार्ग ठप्प!  पंचर बसमुळे तीन-चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; दोन ते तीन तास नागरिकांचा संताप   ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील...

उरळगाव–न्हावरा परिसरातील वीजप्रश्नांना दिलासा; ५ एम.व्ही.ए. पॉवर रोहित्र व ११ केव्ही लिंक लाईनचे लोकार्पण

उरळगाव–न्हावरा परिसरातील वीजप्रश्नांना दिलासा; ५ एम.व्ही.ए. पॉवर रोहित्र व ११ केव्ही लिंक लाईनचे लोकार्पण ✍️ नितीन करडे पुणे : शिरूर-हवेली मतदारसंघातील उरळगाव, न्हावरा, आलेगावपागा व परिसरातील...

जुन्नरमध्ये ३ किलो गांजा जप्त; इनोव्हा कार, स्कूटरसह १०.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जुन्नरमध्ये ३ किलो गांजा जप्त; इनोव्हा कार, स्कूटरसह १०.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीतील अहिल्यादेवी होळकर शाळा क्र....

उरुळी कांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ! महामार्गालगतची दूध डेअरी फोडून सुमारे ६० हजारांची रोकड लंपास; तीन...

उरुळी कांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ! महामार्गालगतची दूध डेअरी फोडून सुमारे ६० हजारांची रोकड लंपास; तीन चोर सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन...

पिंपळे जगताप पाझर तलावातील अज्ञात मृतदेह खून प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा; तिघांना अटक

पिंपळे जगताप पाझर तलावातील अज्ञात मृतदेह खून प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा; तिघांना अटक ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाझर...

error: Content is protected !!