Homeक्राईमउरुळी कांचन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पेठ खून प्रकरणातील दोघे जेरबंद

उरुळी कांचन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पेठ खून प्रकरणातील दोघे जेरबंद

वैयक्तिक रागातून संगनमताने केली हत्या; सोलापूरातून दोन आरोपी अटकेत

✍️नितिन करडे

उरुळी कांचन : पेठ (ता. हवेली) येथील चर्चित खून प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी जलद कारवाई करत दोन आरोपींना सोलापुरातून अटक केली आहे. वैयक्तिक वादातून संगनमताने हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा तपासात झाला आहे. अटक केलेले आरोपी स्वप्निल शिवाजी चौधरी व आदेश रेवलनाथ चौधरी असे आहेत.

घटनेत (ता. १८ डिसेंबर) रोजी संध्याकाळी ७.३० ते १९ डिसेंबर दुपारी १ वाजेच्या दरम्यान पेठ गावातील थेऊर–पेठ रोडलगत, म्हसोबा मंदिराजवळील शेतात संपत तुकाराम चौधरी (वय ४८, रा. वडाचीवाडी पेठ) यांचा धारदार हत्याराने खून करण्यात आला होता. या प्रकरणी मृताचे पुत्र यश संपत चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला.

प्रकरणाचा तपास वेगाने करण्यासाठी उरुळी कांचन पोलिस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन स्वतंत्र तपास पथकांची नियुक्ती करण्यात आली. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फूटेज, कॉल रिकॉर्ड व गुप्त माहितीच्या आधारे संशय आरोपी मध्यप्रदेशातील उज्जैन व सोलापूर येथे असल्याचे समोर आले. अखेर पथकाने २९ डिसेंबर रोजी सोलापुरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

तपासात उघड झाले की, मयत व आरोपी स्वप्निल चौधरी यांच्यात यापूर्वी वैयक्तिक वाद व गुन्हे दाखल होते. त्याच रागातून आरोपींनी संगनमताने खून केला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींना न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार असून, पुढील तपास सुरू आहे.

हि कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलिस अधीक्षक (बारामती) गणेश बिराजदार, उपविभागीय पोलिस अधिकारी (दौंड) बापुराव दडस यांच्या सूचनांनुसार पार पडली. तर पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस निरीक्षक सचिन वांगडे (उरुळी कांचन पोलिस स्टेशन) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रविण कांबळे हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

error: Content is protected !!