अशोक पवार यांनी छ्त्रपती संभाजी महाराज समाधी
स्थळाचे दर्शन घेऊन नागरिकांशी साधला संवाद
नितीन करडे
पुणे प्रतिनिधी : शिरूर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक रावसाहेब पवार यांनी वढू बुद्रुक येथील अखंड महाराष्ट्राचं दैवत छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत आपल्या गावभेट दौऱ्याची सुरुवात केली. यावेळी पुणे मनपाचे विद्यमान नगरसेवक शांताराम कटके, यांच्यासह ग्रामस्थ, विविध कार्यकारी सोसायटीचे आजी माजी सदस्य, माजी सरपंच, माजी उपसरपंच, ज्येठ नागरिक, आदी मान्यवर उपस्थित होते. शांताराम कटके यांनी अशोक पवार यांना जाहीर पाटिंबा दर्शविलाल्याबद्दल आमदार अशोक पवार यांनी शांताराम कटके यांचे यावेळी आभार व्यक्त केले.























