Homeक्राईममोक्का गुन्ह्यातील आरोपीकडून दोन गावठी पिस्टलसह १० जिवंत काडतुसे जप्त; यवत पोलिसांची...

मोक्का गुन्ह्यातील आरोपीकडून दोन गावठी पिस्टलसह १० जिवंत काडतुसे जप्त; यवत पोलिसांची कारवाई; ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत!

मोक्का गुन्ह्यातील आरोपीकडून दोन गावठी पिस्टलसह १० जिवंत काडतुसे जप्त; यवत पोलिसांची कारवाई; ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
पुणे | प्रतिनिधी- ✍️ नितीन करडे

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहजपूर, (ता. दौंड) येथे पोलिसांनी सापळा रचून मोक्का कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल, १० जिवंत काडतुसे आणि दोन रिकाम्या मॅगझिनसह एकूण ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

(ता. ३१ ऑगस्ट) रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता सहजपूर गावच्या हद्दीत मंगलमूर्ती मिसळ हॉटेलजवळ समीर सय्यद हा गावठी पिस्टल घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती यवत पोलिस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल धिरज जाधव यांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पडताळणी केली आणि सापळा रचला. यावेळी समीर जावेद सय्यद (वय २६, रा. सहकारनगर, टिळेकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून विनापरवाना व बेकायदेशीररीत्या विक्री अथवा हस्तांतरणाच्या उद्देशाने जवळ बाळगलेली दोन लोखंडी गावठी पिस्टल मॅगझिनसह, १० पिवळ्या धातूची जिवंत काडतुसे आणि दोन रिकामी मॅगझिन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल धिरज जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी समीर जावेद सय्यद याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ३, ७ व २५ अन्वये यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड करीत आहेत.

पोलिसांच्या तपासात आरोपीविरुद्ध यापूर्वी तीन गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी दोन गुन्हे यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून, एक गुन्हा लोणी काळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर पोलीस आयुक्तालय येथे मोक्का कायद्यांतर्गत दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर आरोपी सध्या जामिनावर असल्याचेही समोर आले आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, पोलीस हवालदार रॉकी देवकाते, संदीप देवकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल धिरज जाधव, अमोल भुजबळ, प्रतिक जगताप, सचिन गुंड, दिनेश लोणकर आणि विनित कुन्हाडे यांनी केली.

दरम्यान, यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणाकडे अवैध शस्त्रे असल्याची माहिती नागरिकांना मिळाल्यास ती माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन यवत पोलिसांकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सासवड पोलिसांची मोठी कारवाई; 12 लाख 94 हजाराचा गुटखा जप्त

सासवड पोलिसांची मोठी कारवाई; 12 लाख 94 हजाराचा गुटखा जप्त ✍️ नितीन करडे पुणे : सासवड पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पान...

वळती येथे ट्रॅक्टर पलटी होऊन शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; शेतात मशागत करताना काळाचा घाला,...

वळती येथे ट्रॅक्टर पलटी होऊन शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; शेतात मशागत करताना काळाचा घाला; परिसरात हळहळ उरुळी कांचन प्रतिनिधी : वळती (ता. हवेली) येथे शेतात...

कोरेगाव मुळमध्ये बुलेटचे ‘फटाके’ पुन्हा सुरूच ; ग्रामस्थांनी पाठलाग करून तिघांना पकडले, पोलिसांच्या ताब्यात...

कोरेगाव मुळमध्ये बुलेटचे ‘फटाके’ पुन्हा सुरूच ; ग्रामस्थांनी पाठलाग करून तिघांना पकडले, पोलिसांच्या ताब्यात दिले; कारवाईनंतरही रात्री सव्वा अकराला पुन्हा ‘बार’   उरुळी कांचन प्रतिनिधी :...

उरुळी कांचनमध्ये महामार्गावर भीषण अपघात! रिक्षातून उतरताना प्रवासी थेट 407 टेम्पोच्या चाकाखाली; जागीच मृत्यू...

उरुळी कांचनमध्ये महामार्गावर भीषण अपघात! रिक्षातून उतरताना प्रवासी थेट टेम्पोच्या चाकाखाली; जागीच मृत्यू ; मृताची ओळख पटवण्याचे आवाहन  प्रवासी वाहतुकीच्या नियमांना हरताळ? रिक्षा भर महामार्गात...

उरुळी कांचनमध्ये गावठी पिस्टलसह शस्त्रसाठा जप्त; रेकॉर्डवरील गुन्हेगाराला एटीएसकडून अटक

उरुळी कांचनमध्ये गावठी पिस्टलसह शस्त्रसाठा जप्त; रेकॉर्डवरील गुन्हेगाराला एटीएसकडून अटक ✍️ नितीन करडे   उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील...

error: Content is protected !!