Homeक्राईमशिरूरमध्ये सलग दुसरी एनडीपीएस कारवाई; २० ग्रॅम एमडीसह स्कॉर्पिओ जप्त, दोघे ताब्यात!

शिरूरमध्ये सलग दुसरी एनडीपीएस कारवाई; २० ग्रॅम एमडीसह स्कॉर्पिओ जप्त, दोघे ताब्यात!

शिरूरमध्ये सलग दुसरी एनडीपीएस कारवाई; २० ग्रॅम एमडीसह स्कॉर्पिओ जप्त, दोघे ताब्यात
✍️ नितीन करडे

पुणे प्रतिनिधी : शिरूर परिसरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांनी सलग दुसऱ्यांदा मोठी कारवाई केली. या कारवाईत २० ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थ आणि स्कॉर्पिओ कार असा एकूण ९ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात ‘नशामुक्त भारत’ आणि ‘ड्रग्स फ्री महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री, वाहतूक व सेवन रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष कारवाई सुरू आहे. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची पथके अवैध व्यवसायांवर लक्ष ठेवून आहेत.

दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी शिरूर परिसरात अंमली पदार्थांची देवाण-घेवाण होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार संजू जाधव यांना मिळाली. दोन इसम स्कॉर्पिओ क्र. एमएच १६ बीएम ७९९९ मधून एमडी अंमली पदार्थ घेऊन विक्रीसाठी शिरूर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचांसह छापा कारवाई केली.

या कारवाईत दादा बबन धावडे (वय २७, रा. कोल्हेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) आणि अमोल राजाराम पोटावळे (वय ३५, रा. राजापूर, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून २० ग्रॅम प्रतिबंधित एमडी अंमली पदार्थ आणि स्कॉर्पिओ कार असा एकूण ९ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान ता.१८ ऑगस्ट रोजीही शिरूर परिसरात एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी दोन आरोपींकडून ११० ग्रॅम प्रतिबंधित एमडी अंमली पदार्थ आणि मोटारसायकल असा सुमारे २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यामुळे शिरूर परिसरातील ही सलग दुसरी एनडीपीएस कारवाई ठरली आहे.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी नागरिक व पालकांना आवाहन केले आहे की, युवा पिढीला अंमली पदार्थांच्या व्यसनापासून वाचविण्यासाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध आहे. परिसरात अंमली पदार्थांची विक्री किंवा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी पोलिसांना कळवावे. माहिती देणाऱ्या नागरिकाची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भासले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सपोनि नितीन केनेकर, पोसई महेश डोंगरे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी! ✍️ नितीन करडे पुणे : गणेशोत्सवाच्या काळात तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतील...

error: Content is protected !!