Homeसामाजिककचऱ्याचे साम्राज्य हटले; ‘पुणे बुलेटिन न्यूज’च्या बातमीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून दखल!

कचऱ्याचे साम्राज्य हटले; ‘पुणे बुलेटिन न्यूज’च्या बातमीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून दखल!

कचऱ्याचे साम्राज्य हटले; ‘पुणे बुलेटिन न्यूज’च्या बातमीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून दखल

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) गावाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिग साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत ‘पुणे बुलेटिन न्यूज’ ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

या वृत्ताची दखल घेत उरुळी कांचन ग्रामपंचायतीने दोन्ही प्रवेशद्वारांवरील साचलेला कचरा उचलून परिसराची स्वच्छता केली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रवेशद्वारांचा परिसर आता स्वच्छ दिसू लागला आहे.

गावाच्या प्रवेशद्वारांवर कचऱ्याचे ढिग, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक तसेच वाहनचालक व नागरिक त्रस्त झाले होते. विशेषतः शाळा व रहिवासी परिसराच्या जवळ कचरा साचल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली होती.

‘पुणे बुलेटिन न्यूज’ने नागरिकांच्या समस्येला वाचा फोडत ‘उरुळी कांचन परिसरात कचऱ्याचे साम्राज्य’ या मथळ्याखाली बातमी प्रसारित केली. त्यानंतर ग्रामपंचायतीने तातडीने कार्यवाही करत कचरा हटविला.

ग्रामपंचायतीच्या या कार्यवाहीचे नागरिकांनी स्वागत केले असून, नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर कार्यवाही होण्यासाठी माध्यमांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल नागरिकांनी ‘पुणे बुलेटिन न्यूज’चे आभार मानले.

दरम्यान, भविष्यात पुन्हा प्रवेशद्वारांवर कचरा साचू नये, यासाठी नागरिकांनीही कचरा उघड्यावर न टाकता ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी! ✍️ नितीन करडे पुणे : गणेशोत्सवाच्या काळात तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतील...

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी ; उरुळी कांचन पोलिसांचा कर्कश्य बुलेट स्वरांवर चाप ! ✍️ नितीन...

error: Content is protected !!