Homeमहत्त्वाचेउरुळी कांचन-कोरेगाव मुळ परिसरात बुलेटच्या कर्कश आवाजाने नागरिक हैराण; विना नंबरच्या गाड्यांवर...

उरुळी कांचन-कोरेगाव मुळ परिसरात बुलेटच्या कर्कश आवाजाने नागरिक हैराण; विना नंबरच्या गाड्यांवर स्टंटबाजी, सोशल मीडियासाठी दहशतीचा खेळ?

उरुळी कांचन- कोरेगाव मुळ परिसरात बुलेटच्या कर्कश आवाजाने नागरिक हैराण; विना नंबरच्या गाड्यांवर स्टंटबाजी, सोशल मीडियासाठी दहशतीचा खेळ?

उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत विना नंबरच्या बुलेट मोटारसायकलींमधून फटाक्यांसारखे कर्णकर्कश (बार) आवाज काढत भरधाव वेगाने स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. “या बुलेटस्वारांवर पोलिसांचा धाक राहिलाच नाही का?” असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बुधवार (दि. ५ ऑगस्ट) रोजी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास कंचन वृंदावन सोसायटी ते बोधे वस्ती या रस्त्यावर एका बुलेटवर तिघेजण (ट्रिपल सीट) बसून मोठमोठे फटाक्यासारखे आवाज काढत नायगाव रस्त्याच्या दिशेने गेल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. या प्रकाराचा व्हिडिओही समोर आला असून तो परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

बायफ रोड, कंचन वृंदावन सोसायटी शेजारील रोड बोधे वस्ती, कोरेगाव मूळ, भवरापूर रोड, तुपे वस्ती रोड या भागात काही ठिकाणी दिवसा तसेच मध्यरात्रीही अशा बुलेटस्वारांच्या फेऱ्या सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, या बुलेटवर बहुतांश वेळा क्रमांकफलकच नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

फटाक्यांसारखे आवाज काढण्यासाठी बुलेटमध्ये बेकायदेशीर फेरफार करून भररस्त्यात स्टंटबाजी केली जाते. त्यानंतर त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अशा प्रकारामुळे वृद्ध, महिला, लहान मुले तसेच रुग्णांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत असून अचानक होणाऱ्या कर्कश आवाजामुळे अपघात होण्याचाही धोका वाढला आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, काही महिन्यांपूर्वी पोलिसांच्या कारवाईनंतर हा प्रकार काही काळ बंद झाला होता. मात्र आता पुन्हा विना नंबरच्या बुलेट भररस्त्यात फिरू लागल्या असून फटाक्यांसारखे आवाज काढून नागरिकांची शांतता भंग केली जात आहे.

उरुळी कांचन–कोरेगाव मूळ हद्दीत ‘फटाके’ फोडणाऱ्या बुलेटस्वारांचा उच्छाद; पोलिसांचा धाक संपला का?

आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, वाहतूक नियमांची उघडपणे पायमल्ली करणारे, ट्रिपल सीट प्रवास करणारे, विना नंबरच्या बुलेटवर स्टंट करणारे आणि ध्वनीप्रदूषण करणारे हे चालक नेमके कोणाच्या आश्रयाने मोकाट फिरत आहेत? पोलिसांनी अशा वाहनांचा शोध घेऊन तत्काळ जप्तीची कारवाई करावी, संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल करावेत आणि नागरिकांना या त्रासातून कायमची मुक्तता द्यावी, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.

“मागील काही महिन्यांपूर्वी बायफ रोड परिसरात सतत असे आवाज येत होते. काही दिवस हा प्रकार बंद झाला होता. मात्र आता पुन्हा विना नंबरच्या बुलेट फटाक्यांसारखे मोठे आवाज काढत उरुळी कांचन परिसरात अनेक ठिकाणी फेऱ्या मारत आहेत. त्यामुळे वृद्ध, महिला आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने वेळीच कठोर कारवाई करून या प्रकाराला आळा घालावा.”

– बापू कांचन, स्थानिक नागरिक, उरुळी कांचन

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मिरवडी ग्रामपंचायतीत सायबर जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद!

मिरवडी ग्रामपंचायतीत सायबर जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद क्विक हील फाउंडेशनच्या 'सायबर शिक्षणातून सायबर सुरक्षा' उपक्रमांतर्गत नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : वाढत्या...

उरुळी कांचनमध्ये अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई; एकावर गुन्हा दाखल

उरुळी कांचनमध्ये अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई; एकावर गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे उरुळी कांचन (ता. हवेली): उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत जय मल्हार रोड...

उड्डाणपुलाच्या कामापूर्वी पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करा; अन्यथा कामाला सुरुवात करू नका : प्रदीप वसंतराव...

उड्डाणपुलाच्या कामापूर्वी पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करा; अन्यथा कामाला सुरुवात करू नका : प्रदीप वसंतराव कंद आमदार ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांच्या उपस्थितीत पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित...

उन्नत मार्गांच्या पार्श्वभूमीवर पीएमआरडीए आयुक्तांचा शिरूर-हवेली दौरा; आमदार माऊली कटके यांनी मांडल्या विकासाच्या मागण्या

उन्नत मार्गांच्या पार्श्वभूमीवर पीएमआरडीए आयुक्तांचा शिरूर-हवेली दौरा; आमदार माऊली कटके यांनी मांडल्या विकासाच्या मागण्या ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : : पुणे–सोलापूर व पुणे–अहिल्यानगर राष्ट्रीय...

पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाची नाथाची वाडी येथे धडक कारवाई ;१२० लीटर ताडी व ३५...

पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाची नाथाची वाडी येथे धडक कारवाई ;१२० लीटर ताडी व ३५ लीटर हातभट्टी दारू जप्त ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : यवत (ता....

error: Content is protected !!