Homeआरोग्यनिसर्गोपचार आश्रमाचा ‘योग संगम’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; योगाचा संदेश घराघरात!

निसर्गोपचार आश्रमाचा ‘योग संगम’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; योगाचा संदेश घराघरात!

निसर्गोपचार आश्रमाचा ‘योग संगम’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; योगाचा संदेश घराघरात

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : परमपूज्य महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील निसर्गोपचार आश्रमाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ निमित्त महिनाभर राबविण्यात आलेल्या “योगा फॉर हेल्दी एजिंग” या विशेष अभियानाचा समारोप २१ जून रोजी मोठ्या उत्साहात “योग संगम” या भव्य कार्यक्रमाने झाला. या अभियानाच्या माध्यमातून तब्बल १८ हजारांहून अधिक नागरिकांपर्यंत योग आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश पोहोचविण्यात आला.

महिनाभर चाललेल्या या अभियानात ताय ची, हस्त योग, चेअर योग, डेस्कटॉप योग, साउंड मेडिटेशन, व्याख्यानमाला आदींसह एकूण १६ विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील सर्व वयोगटांपर्यंत योगाचे महत्त्व पोहोचविण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले. याशिवाय दौंड, हिंगणगाव, वाडेबोल्हाई तसेच विविध शाळा, उद्योगसंस्था आणि श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना येथे विशेष योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. योगाच्या माध्यमातून शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्याचा संदेश मोठ्या प्रमाणात जनमानसापर्यंत पोहोचला.

निसर्गोपचार आश्रमाचा ‘योग संगम’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; १८ हजारांहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचला योगाचा संदेश

कार्यक्रमात निसर्गोपचार आश्रमाचे संचालक व विश्वस्त सचिव डॉ. अभिषेक देविकार यांनी “योग ३६५” ही संकल्पना मांडत निरोगी वृद्धत्वासाठी योगाचे वैज्ञानिक महत्त्व स्पष्ट केले. योग हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून तो वर्षभर अंगीकारला गेला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. तसेच गेले अनेक वर्षापासून हा उपक्रम निसर्गोपचार आश्रम च्या माध्यमातून राबविला जातो. असे डॉ. अभिषेक देवीकर देविकार यांनी सांगितले.

या संपूर्ण अभियानाचे समन्वयन डॉ. समृद्धी व्यास यांनी केले. तसेच योगाचार्य डॉ. भगवती मुखेडकर, जलींदर वाडेकर, तुषार जगदाळे आणि राहुल मेमाणे यांनी विविध उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले.

दरम्यान, निसर्गोपचार आश्रम व Dietos यांच्या संयुक्त विद्यमाने “नो गॅस डे” या अभिनव उपक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. नैसर्गिक व न शिजवलेल्या आहाराचा प्रसार, एलपीजी बचत आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत आहे.

या व्यापक अभियानातून योग हा केवळ आंतरराष्ट्रीय योग दिनापुरता मर्यादित नसून तो दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनविण्याचा संदेश देण्यात आला. योगाच्या माध्यमातून निरोगी, सुदृढ आणि आनंदी समाज घडविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत!

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ६० हजारांचा मोबाईल मालकिणीला परत ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीतील एका रिक्षाचालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे हरवलेला...

गुटखा बंदी असतानाही गुटखा येतो तरी कुठून? २० रुपयांची विमल ५० रुपयांना; काही ठिकाणी...

गुटखा बंदी असतानाही गुटखा येतो तरी कुठून? २० रुपयांची विमल ५० रुपयांना; काही ठिकाणी छुप्या तर काही ठिकाणी खुलेआम विक्री सुरूच.... पोलीस प्रशासन मात्र...

उरुळी देवाचीतील शेतात गोवंश कत्तलीचा आरोप; फुरसुंगी पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा

उरुळी देवाचीतील शेतात गोवंश कत्तलीचा आरोप; फुरसुंगी पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा ✍️ नितीन करडे पुणे : उरुळी देवाची (ता. हवेली) येथील मंतरवाडी परिसरातील एका शेतात...

पुणे-सोलापूर महामार्गावर जीवघेणा स्टंट! २० फूट उंच डीजे गाडीवर तरुणांचा धिंगाणा; व्हिडीओ सोशल मीडियावर...

पुणे-सोलापूर महामार्गावर जीवघेणा स्टंट! २० फूट उंच डीजे गाडीवर तरुणांचा धिंगाणा; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल  उरुळी कांचन : पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी येथे एका डीजे वाहनावर...

धोकादायक पुलाच्या जागी नव्या पुलाचे भूमिपूजन; परिसरातील शेतकरी, नागरिकांमध्ये समाधान

धोकादायक पुलाच्या जागी नव्या पुलाचे भूमिपूजन; परिसरातील शेतकरी, नागरिक समाधान, शिंदवणेतील काळे शिवाराला दिलासा माजी सरपंच गणेश महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश; आमदार माऊली कटके यांच्या...

error: Content is protected !!