Homeसामाजिकउरुळी कांचन येथे नियम धाब्यावर; पुणे–सोलापूर महामार्गावर विरुद्ध दिशेने धोकादायक प्रवास

उरुळी कांचन येथे नियम धाब्यावर; पुणे–सोलापूर महामार्गावर विरुद्ध दिशेने धोकादायक प्रवास

विरुद्ध दिशेने धोकादायक प्रवास; जेजुरी राज्य महामार्गासाठी पुणे–सोलापूर महामार्गावर ‘डेथ ट्रॅक’!
उरुळी कांचन येथे नियम धाब्यावर; पुणे–सोलापूर महामार्गावर विरुद्ध दिशेने धोकादायक प्रवास

✍️ नितीन करडे
उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील तळवाडी चौक येथे थोडे अंतर वाचवण्याच्या नादात काही वाहनचालक पुणे–सोलापूर महामार्गावर अक्षरशः मृत्यूशी खेळ करत आहेत. सोलापूरच्या दिशेला आलेली वाहने जेजुरी राज्य महामार्गावर जाण्यासाठी अनेक चालक थेट विरुद्ध बाजूने धोकादायक प्रवास करत असल्याने मोठ्या अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. या बेजबाबदार प्रकारामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अनेकदा कोंडीची परिस्थितीही निर्माण होत आहे.
दररोज पहाटेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत या मार्गावर सर्रासपणे विरुद्ध दिशेने वाहतूक सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे यात पाईप कंपनीचे टेम्पो, मोठे ट्रक, पार्सल चे कंटेनर, पेट्रोल-डिझेल टँकर, सिमेंटचे वाहतूक टेम्पो, ट्रक तसेच इतर छोटी-मोठी वाहनेही बिनधास्तपणे पुणे सोलापूर महामार्ग वरूनच विरुद्ध दिशेने धावताना दिसत आहेत. पहाटेच्या वेळी पुणे–सोलापूर महामार्गावर वाहने वेगाने धावत असतात. अशा वेळी समोरून अचानक येणारी ही विरुद्ध दिशेची वाहने एखाद्या भीषण अपघाताला निमंत्रण देत आहेत.

जेजुरी मार्गासाठी शॉर्टकट, पण जीवावर बेतणारा; पुणे–सोलापूर महामार्गावर ‘डेथ ट्रॅक’

गेल्या आठ दिवसांत उरुळी कांचन परिसरात झालेल्या अपघातांच्या घटना ताज्या असतानाही काही वाहनचालक नियमांना केराची टोपली दाखवत असल्याचे दिसून येत आहे. वाहतूक नियमांचे उघड उल्लंघन होत असतानाही या प्रकारावर प्रभावी कारवाई होत नसल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत.

रस्त्यावर नियमांचा खेळखंडोबा; उलट दिशेने वाहनांची गर्दी! कारवाई कधी?

वेळेत या विरुद्ध दिशेने धावणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई झाली नाही तर भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करून अशा वाहनचालकांना आळा घालावा, अशी तीव्र मागणी नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी ; उरुळी कांचन पोलिसांचा कर्कश्य बुलेट स्वरांवर चाप ! ✍️ नितीन...

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे शासकीय स्तरावर घेण्यात आलेल्या...

सासवड पोलिसांची मॉडिफाइड सायलेन्सरच्या ४७ बुलेटवर कारवाई; तब्बल ४ लाख ७० हजार दंड वसूल,...

सासवड पोलिसांची मॉडिफाइड सायलेन्सरच्या ४७ बुलेटवर कारवाई; तब्बल ४ लाख ७० हजार दंड वसूल, तसेच वाहतूक नियम भंग करणाऱ्या ३२६ जणांवर कारवाई मॉडिफाइड बुलेट सायलेन्सर...

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई!

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई ✍️ नितीन करडे दौंड : यवत (ता. दौंड) पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाईची...

error: Content is protected !!