Homeक्राईमखळबळजनक! उरुळी कांचनमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यांचा ‘बाहुबली’ प्रकार; लोखंडी स्टिकसह व्हिडिओ व्हायरल 

खळबळजनक! उरुळी कांचनमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यांचा ‘बाहुबली’ प्रकार; लोखंडी स्टिकसह व्हिडिओ व्हायरल 

खळबळजनक! उरुळी कांचनमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यांचा ‘बाहुबली’ प्रकार; लोखंडी स्टिकसह व्हिडिओ व्हायरल 

✍️नितीन करडे

पुणे: हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे एका नामांकित शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्यांनी केलेल्या अजब कारनाम्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शाळेच्या गेटमधून बाहेर पडताना बारा ते चौदा विद्यार्थ्यांबरोबर एका विद्यार्थ्यांने लोखंडी (स्टील) स्टिक हातात घेऊन, शाळेच्या शर्टची कॉलर उडवत “यहाँ के बाहुबली हम है” अशा गाण्याच्या पार्श्वसंगीतावर व्हिडिओ शूट करून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने शाळा परिसरात भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे हा प्रकार शाळेच्या गेटजवळच घडल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही चिंता वाढली आहे. व्हायरल व्हिडिओमुळे उरुळी कांचन परिसरात नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले असून, “विद्यार्थ्यांकडे जीवितहानी पोहोचवणारी वस्तू आली कुठून?” असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

” अल्पवयीन विद्यार्थ्याकडून लोखंडी स्टिक हातात घेऊन कॉलर उडवत शाळेच्या गेट परिसरात दहशत; व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल” 

त्याचवेळी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियासाठी व्हिडिओ तयार करत बाहुबली स्टाईल गाण्याचा वापर करून “यहाँ के बाहुबली हम है” असा संदेश देत शाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच काही वेळातच तो मोठ्या प्रमाणात शेअर झाला. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकारानंतर अनेक पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, “शाळेच्या आवारात किंवा गेटसमोर अशा वस्तू कशा येतात?”, “विद्यार्थ्यांना अशा प्रकारे दहशत पसरवण्याचे धाडस कसे होते?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. ‘कार्यवाही काय होणार ?’

व्हायरल व्हिडिओमुळे काही विद्यार्थ्यांमध्ये मानसिक दबाव निर्माण झाल्याचेही सांगण्यात येत आहे. काही पालकांनी प्रशासन व शाळा व्यवस्थापनाने तातडीने कारवाई करून वचक बसवावी अशी मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांकडून लोखंडी स्टिकसारख्या वस्तूचा वापर करून भीती निर्माण करणे हा गंभीर प्रकार मानला जात असून, अशा घटनांवर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास भविष्यात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद!

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद ✍️ नितीन करडे दौंड : नाथाचीवाडी (ता. दौंड) परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरीचा...

गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक !

गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक  उरुळी कांचनमध्ये वर्गणीवरून वाद; “आमच्या गावात पोट भरायला आला आहेस, एवढेच पैसे द्यावे लागतील” असा आरोप उरुळी कांचन...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा सांस्कृतिक सोहळा ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचनचे...

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक!

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक ✍️ नितीन करडे पुणे : आजी-माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देणे आणि त्यांच्या विविध अडचणी जाणून...

पेरणेत दीड महिन्यांपासून बंद असलेले वीज रोहीत्र (डिपी) ४८ तासात बसवले!

पेरणेत दीड महिन्यांपासून बंद असलेले वीज रोहीत्र(डिपी) ४८ तासात बसवले. प्रदिप वसंत कंद यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लोणीकंद प्रतिनिधी : पेरणे (ता.हवेली) येथे विजय रणस्तंभ...

error: Content is protected !!