Homeमहत्त्वाचेमाझ्या हद्दीत ठिल्लारपणा, दादागिरी खपवून घेणार नाही! -उरुळी कांचन पोलीस निरीक्षक संचिन...

माझ्या हद्दीत ठिल्लारपणा, दादागिरी खपवून घेणार नाही! -उरुळी कांचन पोलीस निरीक्षक संचिन वांगडे यांचा इशारा

माझ्या हातीत ठिल्लारपणा, दादागिरी खपवून घेणार नाही! -उरुळी कांचन पोलीस निरीक्षक संचिन वांगडे यांचा इशारा

✍️ नितीन करडे,

उरुळी कांचन (ता. हवेली) उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी शाळा, कॉलेजचा परिसरात पेट्रोलिंग करत आढावा घेतला असुन मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे पालक वर्गांनी पोलिसांचे कौतुक केले असून आभार मानले आहे.

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत कोणत्याही प्रकारची दादागिरी, ठिल्लारपणाचा किंवा मोकाट वर्तनाचा प्रकार सहन केला जाणार नाही, असा कडक इशारा पोलीस निरीक्षक संचिन वांगडे यांनी दिला आहे. शाळा आणि कॉलेज परिसरात मोकाट फिरणारे, विद्यार्थिनींना त्रास देणारे, तसेच सार्वजनिक ठिकाणी उगाच गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिसांकडून थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सचिन वांगडे म्हणाले, “शाळा-कॉलेजच्या परिसरात ठिल्लारपणा किंवा अराजक निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. विशेषतः मुलींना शाळेत जाताना किंवा येताना त्रास देणाऱ्यांवर कठोर पावले उचलली जातील. जर अशा प्रकारचा त्रास होत असेल, तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. तक्रारदाराचे गुपित ठेवले जाईल.”

अलीकडे काही ठिकाणी तरुण मंडळींकडून शाळेच्या परिसरात हुज्जत, आवाजाच्या गाड्या, तसेच मुलींना चिडवण्याच्या तक्रारी समोर येत होत्या. यावरूनच पोलिसांनी आता आक्रमक भूमिका घेत “ठिल्लारपणाला आळा घालण्याचा” निर्धार केला आहे.

ही कौतुकस्पद कारवाई पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक प्रवीण कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले, पोलीस हवालदार कमलेश होले, सचिन जगताप, प्रशांत पवार, विशाल रासकर, शैलेश लोखंडे, निलेश जाधव, पो कॉन्स्टे  सुदर्शन माने, धनंजय भोसले, अमोल खांडेकर, अश्वजित मोडोड, सुमित वाघ, पो शि हरिश शितोळे, यांनी केली आहे.

पोलीस निरीक्षक वांगडे यांनी नागरिकांना आवाहन केले की, “सुरक्षित आणि सुसंस्कृत परिसर निर्माण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. कोणीही बेकायदेशीर किंवा गैरप्रकार करत असल्याचे दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवा. आम्ही ठोस कारवाई करु.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद!

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद ✍️ नितीन करडे दौंड : नाथाचीवाडी (ता. दौंड) परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरीचा...

गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक !

गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक  उरुळी कांचनमध्ये वर्गणीवरून वाद; “आमच्या गावात पोट भरायला आला आहेस, एवढेच पैसे द्यावे लागतील” असा आरोप उरुळी कांचन...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा सांस्कृतिक सोहळा ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचनचे...

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक!

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक ✍️ नितीन करडे पुणे : आजी-माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देणे आणि त्यांच्या विविध अडचणी जाणून...

पेरणेत दीड महिन्यांपासून बंद असलेले वीज रोहीत्र (डिपी) ४८ तासात बसवले!

पेरणेत दीड महिन्यांपासून बंद असलेले वीज रोहीत्र(डिपी) ४८ तासात बसवले. प्रदिप वसंत कंद यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लोणीकंद प्रतिनिधी : पेरणे (ता.हवेली) येथे विजय रणस्तंभ...

error: Content is protected !!