Homeताज्या बातम्याकोलवडी-मांजरी वर्दळीच्या रस्त्याचे रुंदीकरणासह नूतनीकरण करावे: सरपंच विनायक गायकवाड...

कोलवडी-मांजरी वर्दळीच्या रस्त्याचे रुंदीकरणासह नूतनीकरण करावे: सरपंच विनायक गायकवाड…

कोलवडी-मांजरी वर्दळीच्या रस्त्याचे रुंदीकरणासह नूतनीकरण करावे: सरपंच विनायक गायकवाड…

[पडलेल्या खड्यांनी रस्त्याची दुरवस्था;अपघातांचे प्रमाण वाढले]-

वाडेबोल्हाई/पुणे:प्रतिनिधी ; ग्रामीण भागापासून शहरी भागाला जोडणारा महत्वपूर्ण दळणवळण व वर्दळीचा रस्ता मार्ग म्हणून कोलवडी-मांजरी खुर्द-हडपसर रस्त्याला महत्व प्राप्त झाले आहे.कोलवडी-साष्टे मार्गे मांजरी खुर्द,मांजरी बुद्रुक पुढे हडपसर शहराकडे हा रस्ता जातो. परंतु सद्यस्थितीत या रस्त्याची ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांमुळे अतिशय दुरवस्था झाली आहे.तसेच हा रस्ता पूर्वीपासून पूर्णपणे अरुंद असल्याने येथे दोन चारचाकी वाहने बसने अवघड होत असल्याने येथे अतिशय अरुंद व दुरवस्थेतील रस्त्यांमुळे या मार्गावर दररोज अपघत घडत आहे.त्यामुळे अपघातांचे प्रमाण अधिक वाढले असून अनेकांना या रस्त्यावर आपले जीव गमवावे लागले आहेत.कोलवडी गाव महानगर पालिकेच्या शेजारी असून मोठी लोकसंख्या झापाट्याने वाढली आहे.त्यामुळे शासनाने,संबंधित बांधकाम खात्याने कोलवडी-मांजरी वर्दळीच्या रस्त्याचे रुंदीकरणासह नूतनीकरण त्वरित करण्याची मागणी कोलवडी गावचे लोकनियुक्त सरपंच विनायक गायकवाड यांनी शासन स्तरावरील सबंधित खाते व बांधकाम विभागाकडे वेळोवेळी केली आहे.

तसेच या रस्त्यावर ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे जाणारी प्रवासी वाहने ही बंद असून रस्त्यात पीएमपीएल बसला या रस्त्यावर चालताना अडथळा येत असल्याने बससेवाही बंद अवस्थेत असल्याने प्रवासी व शाळकरी मुलांची गैरसोय होत आहे.त्यामुळे या रस्त्याकडे लवकरात लवकर संबंधित रस्ते बांधकाम खात्याने लक्ष घालून योग्य तो मार्ग काढणे गरजेचे असल्याचे कोलवडी व मांजरी ग्रामस्थ यांच्यामध्ये चर्चा रंगत आहे. हा रस्ता मार्गाने अष्टविनायक असलेल्या थेऊर चिंतामणी धार्मिक स्थळाकडे जाणारे भाविक भक्त, प्रवास करणारे नागरिक,वाहन चालक अक्षरशःहा वैतागले असून जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करीत आहे.त्यामुळे कोलवडी-मांजरी रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरण त्वरित व्हावेत यासाठी कोलवडी मांजरी खुर्द या दोन्ही गावातील ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत.

मांजरी खुर्द रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांमुळे रस्त्याची झालेली दुरवस्था.,अरुंद असलेला रस्ता.

रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरण लवकर न झाल्यास कोलवडीकरांचा आंदोलनाचा इशारा:-

दळणवळण व वर्दळीच्या दृष्टीने कोलवडी-मांजरी रस्ता मार्ग आता महत्त्वपूर्ण झाला असून त्यामुळे अनेक वर्षापासून या रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरण होण्याचे काम रखडले आहे.जर यापुढे शासनाने किंवा सबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही तर यापुढे कोलवडी गावचे लोकनियुक्त सरपंच विनायक गायकवाड,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत गायकवाड,उपसरपंच संदिप गायकवाड,माजी उपसरपंच विकास कांचन,माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य रमेश मदने,माजी उपसरपंच नानासाहेब भाडळे,ग्रामपंचायत सदस्य सचिन गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य योगेश मुरकुटे,युवा उद्योजक संतोष मुरकुटे,युवा उद्योजक रवींद्र गायकवाड,उद्योजक अजित कदम,आदींनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला असल्याचे सरपंच गायकवाड यांनी माहिती देताना सांगितले.

कोलवडी गाव ग्रामीणकडून शहरीकरणाकडे जात असल्याने लोकवस्ती झापाट्याने वाढून अनेक समस्या निर्माण होत आहे.यामध्ये महत्वाची समस्या ही रस्त्याची असून याचं रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरण त्वरित झाले पाहिजेत.त्यासाठी आम्ही आता गावातील ग्रामस्थांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याची तयारी आम्ही केली आहे.

– विकास कांचन,माजी उपसरपंच-कोलवडी,साष्टे

कोलवडी-मांजरी रस्त्याच्या रुंदीकरण व नूतनीकरण त्यावर बजेट टाकले होते,मागे या रस्त्याची मोजणी करून सर्व्हे केला होता.त्यानंतर रुंदीकरण करण्यासाठी हा विषय भूमी अभिलेख ला टाकले आहे.बरेच वर्ष झाले या रस्त्याचे डांबरीकरनाचे काम रखडले आहे ते पूर्ण करण्याचा व रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

-अश्विनी तांदळे,सबंधित अधिकारी,बांधकाम खाते,कोलवडी-मांजरी रस्ता

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सासवड येथे भीषण अपघात; दारू पिऊन कार चालवणाऱ्या चालकामुळे दोघांचा मृत्यू, दोघे जखमी

सासवड येथे भीषण अपघात; दारू पिऊन कार चालवणाऱ्या चालकामुळे दोघांचा मृत्यू, दोघे जखमी ✍️ नितीन करडे पुणे : सासवड (ता. पुरंदर) – सासवड परिसरात शनिवारी (दि.18...

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी ६ तासांत जेरबंद; चंदननगर पोलिसांची तात्काळ कारवाई

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी ६ तासांत जेरबंद; चंदननगर पोलिसांची तात्काळ कारवाई ✍️ नितीन करडे पुणे : चंदननगर परिसरात घडलेल्या खुनाच्या गंभीर घटनेत पोलिसांनी अवघ्या ६ तासांत आरोपींना...

उरुळी कांचनमध्ये अपघातानंतर पोलिस व ग्रामपंचायतीची तत्परता; मोठा अनर्थ टळला

उरुळी कांचनमध्ये अपघातानंतर पोलिस व ग्रामपंचायतीची तत्परता; मोठा अनर्थ टळला ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बसस्टॉप...

मिरवडीच्या शेतकरी कुटुंबातील अल्फिया शेखची पोलीस खात्यात दमदार एन्ट्री; गावाचा अभिमान उंचावला!

मिरवडीच्या शेतकरी कुटुंबातील अल्फिया शेखची पोलीस खात्यात दमदार एन्ट्री; गावाचा अभिमान उंचावला ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : दौंड तालुक्यातील मिरवडी गावातील एका सामान्य...

चंदननगर पोलिसांची तत्परता; आयटीसीच्या एमडीची हरवलेली बॅग अवघ्या २ तासांत शोधून दिली

चंदननगर पोलिसांची तत्परता; आयटीसीच्या एमडीची हरवलेली बॅग अवघ्या २ तासांत शोधून दिली ✍️ नितीन करडे | पुणे, दि. १५ एप्रिल, रोजी चंदननगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी दाखवलेल्या...

error: Content is protected !!