Homeक्राईमशिरसवडी येथे शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला – चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरसवडी येथे शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला – चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

✍️नितीन करडे
पुणे : शिरसवडी (ता. हवेली) येथील स्थानिक आशापुरा किराणा मार्केटसमोर सोमवारी (दि. 27 ऑक्टोबर ) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रशांत कुंडलिक नागवडे (वय 37, रा. शिरसवडी, ता. हवेली, जि. पुणे) या शेतकऱ्यावर अनोळखी इसमांसह चार जणांनी धारदार हत्यार व दांडक्यांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात नागवडे गंभीर जखमी झाले असून सध्या ते खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
नागवडे यांनी पोलीसांना दिलेल्या जबाबानुसार, ते दुपारी आपल्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी दुचाकीने विंडम स्कूलकडे जात असताना आशापुरा किराणा दुकानासमोर पोहोचताच, एक अनोळखी इसम हातात धारदार हत्यार घेऊन आला व काहीही न बोलता त्यांच्यावर हल्ला केला. त्याने केलेला पहिला वार चुकवित असताना नागवडे खाली पडले आणि त्या वेळी त्या इसमाने डोक्यावर, नाकावर, मागील बाजूस व पायावर वार केले. त्याच्यासोबतच्या दुसऱ्या इसमाने दांडक्याने डोक्यात मारहाण केली. यानंतर इतर ३ ते ४ साथीदारांनी दगडविटांनी हल्ला करून नागवडे यांना गंभीर जखमी केले.

घटनेदरम्यान नागवडे यांनी त्यांपैकी एकास ओळखले असून त्याचे नाव बोडके (रा. गावडेवाडी, पुणे) असे सांगितले आहे. हल्लेखोर पांढऱ्या रंगाच्या स्पोर्ट्स बाईक व स्कुटीवरून पसार झाले. नागवडे यांच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यामागे देविदास गोविंद निकाळजे (रा. शिरसवडी, गावडेवाडी) याचा हात असल्याचा त्यांचा संशय आहे. ऑगस्ट महिन्यात निकाळजे यांनी त्यांच्या घरी येऊन जीव घेण्याची धमकी दिली होती, असे त्यांनी जबाबात नमूद केले आहे.
दरम्यान, हल्ल्यानंतर शिरसवडी परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास लोणीकंद पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
शेतकरी प्रशांत नागवडे यांच्यावर धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला
घटनेत चार ते पाच जणांचा सहभाग
नागवडे गंभीर जखमी असुन त्यांच्यावर वाघोली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू
लोणीकंद पोलिसांकडून गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बॉडी बिल्डींगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित इंजेक्शनची बेकायदा विक्री करणारा आरोपी जेरबंद

बॉडी बिल्डींगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित इंजेक्शनची बेकायदा विक्री करणारा आरोपी जेरबंद ✍️ नितीन करडे  पुणे : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत बॉडी बिल्डींग व...

उरुळी कांचन ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा? ;चार दिवसापासुन दिवसाढवळ्या स्ट्रीट लाईट व हायमास दिवे चालुच 

उरुळी कांचन ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा? ;चार दिवसापासुन दिवसाढवळ्या स्ट्रीट लाईट व हायमास दिवे चालुच  ✍️ नितीन करडे उरुळी कांचनमध्ये स्ट्रीट लाईट व्यवस्थेचा बोजवारा उरुळी कांचन, (ता. हवेली) :...

पुरंदर विमानतळाबाबत खोटी माहिती प्रसारित; सासवड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

पुरंदर विमानतळाबाबत खोटी माहिती प्रसारित; सासवड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे पुणे, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुरंदर प्रकल्पाबाबत खोटी व दिशाभूल...

वयोवृद्ध आजोबांच्या घरफोडीचा छडा; ओतूर पोलिसांची कारवाई, आरोपी अटकेत

वयोवृद्ध आजोबांच्या घरफोडीचा छडा; ओतूर पोलिसांची कारवाई, आरोपी अटकेत ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : जुन्नर तालुक्यातील नेतवड येथील कुटेमळा येथे ९५ वर्षीय वृद्धाच्या घरात झालेल्या...

पुणे–सोलापूर महामार्गावर ‘राँग साईड’चा कहर; रॉंग साईडने येणाऱ्या वाहनांमुळे उरुळी कांचन येथील चौक बनत...

पुणे–सोलापूर महामार्गावर ‘राँग साईड’चा कहर; रॉंग साईडने येणाऱ्या वाहनांमुळे उरुळी कांचन येथील चौक बनत आहेत मृत्यूचा सापळा ✍️नितीन करडे उरुळी कांचन : पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन...

error: Content is protected !!